Share

करुणा मुंडे यांना जामीन तर मिळाला पण; कोर्टाने घातल्या ‘या’ अटी

Published On: 

बीड : गेल्या १६ दिवसांपासून तुरुंगामध्ये असणाऱ्या करुणा मुंडे यांना आज न्यायालयाने दिलासा दिला आहे. करुणा मुंडे यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. करुणा मुंडे यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीचा निकाल अंबाजोगाई जिल्हा सत्र न्यायलयाने आज दिला आहे. परंतु करुणा मुंडे यांना जामीन देताना कोर्टाने काही अटी घातल्या आहेत.

जोपर्यंत चार्जशीट म्हणजेच आरोपपत्र दाखल होत नाही तोपर्यंत करुणा मुंडे यांना परळी आणि अंबाजोगाई तालुक्यात येण्यास कोर्टाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी त्या बीड जिल्ह्यातील परळीमध्ये आल्या होत्या. त्यावेळी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. त्यांची रवानगी बीड कारागृहात न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.

परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात दोन महिलांवर जातीवाचक शिवीगाळ करून प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपावरून दाखल गुन्ह्यात करुणा मुंडे या ६ सप्टेंबरपासून न्यायालयीन कोठडीत होत्या. त्यांनी वकिलांमार्फत अंबाजोगाई अपर जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मंगळवारी न्या. सुप्रिया सापतनेकर यांच्या न्यायालयासमोर दोन्ही बाजूंचे युक्तिवाद झाले. यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने अशोक कुलकर्णी तर करुणा मुंडे यांच्या वतीने ॲड. जयंत भारजकर यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय मंगळवारी दिला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!