वर्धा: हिंगणघाट येथे दोन वर्षांपूर्वी झालेल्या जाळीत कांडात पिडीतेला अखेर न्याय मिळाला आहे. हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून तरुण प्राध्यापिकेला जिवंत जाळण्यात आले होते. वर्धा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपी विकेश नगराळेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. बुधवारी ९ फेब्रुवारीला या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली होती. आज १० फेब्रुवारीला न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली आहे. अशी माहिती सरकारी पक्षाचे वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी दिली आहे.
या प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ (BJP Leader Chitra Wagh) यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाचा निकाल आला परंतु शासनाने या परिवाराला दिलेल्या लेखी आश्वासनांची पुर्तता अद्याप केलेली नाही हे दुदैवी आहे, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी ट्वीट करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पुढे बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, हिंगणघाटच्या निर्भयाला जाळून मारणाऱ्या नराधमाला जन्मठेपेची शिक्षा झालीये. खरं तर अशा नराधमांना फासावरच लटकवायला हवंय, ही माणसं नाहीतच, हे तर हैवान आहेत, अशा तीव्र शब्दात चित्रा वाघ यांनी आपले मत व्यक्त केले आहे. या संबंधी चित्रा वाघ यांनी एक व्हिडिओ शेयर केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- हिजाब बंदीवर जितेंद्र आव्हाडांचे भाजपला निशाणा करत खोचक ट्विट; वाचा सविस्तर
- महाराष्ट्रात टोळीचे सरकार – चंद्रकात पाटील
- मुस्लिम भगिनींनी माझे कौतुक केल्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखते, नरेंद्र मोदी यांची विरोधकांवर टीका
- “महाराष्ट्राच्या बदनामीच काय…”; चंद्रकांत पाटलांची महाविकास आघाडीवर टीका
- नरेंद्र मोदींचे आश्वासन पूर्ण; शेतकऱ्याच्या खात्यात आले पंधरा लाख; मात्र…


