करमाळा : उजनीतून इंदापुरसाठीच्या नियोजित उपसा सिंचन योजनेच्या कामाचे सर्वेक्षण रद्द करण्याचा आदेश काल राज्याच्या पाटबंधारे विभागाने काढला. यामुळे उजनीच्या पाण्याबाबत चाललेल्या वादावर अखेर पडदा पडला.यानंतर आता सांडपाण्याच्या नावाखाली होणारी राजकीय तोडपाणी जनरेट्यामुळे यशस्वी झाली नाही,अशी मार्मिक प्रतिक्रिया माजी आमदार नारायण पाटील यांनी दिली आहे.
याबाबत अधिक बोलताना पाटील म्हणाले की सोलापुर जिल्ह्यातील एकीचा हा विजय असुन हा आदेश रद्द होण्यामागे जिल्ह्यातील सर्व आजीमाजी लोकप्रतिनिधी, विविध संघटनांचे आंदोलनकर्ते, सर्व पक्षांचे जिल्हाप्रमुख व शेतकरी, धरणग्रस्त आदि सर्वांनी केलेल्या प्रखर विरोधामुळे प्रशासनास एक पाऊल मागे घेऊन सर्वेक्षण तात्काळ थांबवावे लागले. पण मुळात करमाळा मतदार संघाचे आ. संजय शिंदे यांच्या निष्क्रियता व मुकसंमती यामुळेच इंदापुरच्या नियोजित उपसा सिंचन योजनेने कागदावर जन्म घेतला. या योजनेस कार्यालयीन पातळीवरच विरोध करणे हे आमदार शिंदे यांचे दायित्व होते.
पाटील म्हणाले, आज हा आदेश रद्द झाल्याने पत्र हाती घेऊन एक मोठे काम केल्याचा आव आ. संजय शिंदे हे करत असून स्वतःचे घर उघडे ठेऊन नंतर चोरी सापडल्यावर आनंदोत्सव साजरा करण्यासारखा हा प्रकार आहे. वास्तविक सोलापुर जिल्ह्यातील जनरेट्याचा प्रभाव प्रशासनावर पडल्याने आदेश रद्द झाला असुन याबाबत श्रेयवाद व चमकोगीरी करण्याचा केविलवाणा प्रयत्न कोणी करु नये.
आमदार संजय शिंदे हे वारंवार मराठवाड्यास जाणाऱ्या पाण्याबाबत बोलत असुन करमाळा मतदार संघाच्या 2004 साली कार्यरत असलेल्या तत्कालीन आमदारांच्या भुमिकेबाबत शंका घेत आहेत.करमाळा तालुक्यातील अनेकवर्ष रखडलेली दहिगाव उपसा सिंचन योजनेचे काम पुर्ण करुन हि योजना मी कार्यान्वित केली. कुकडीचे नियमीत आवर्तने करमाळा तालूक्यास मिळवून दिली. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून भरीव कामे केली. एकंदरीत तालूक्यातील ओलिताखाली येणारे क्षेत्र वाढवले. आता विद्यमान आमदार संजय शिंदे यांनी आपल्या उर्वरीत काळात एखादा गुंठा तरी ओलीताखाली आणून दाखवावा. आयत्या पीठावर रेघोट्या न मारता नवीन विकासकामासाठी प्रयत्न करावेत, असा टोलाही माजी आमदार नारायण पाटील यांनी लगावला.
महत्त्वाच्या बातम्या
- उस्मानाबादला मोठा दिलासा; तब्बल दीड महिन्यानंतर रुग्णांच्या संख्येत घट
- चंद्रपुरातील दारूबंदी हटविण्याचा निर्णय दुर्दैवी : देवेंद्र फडणवीस
- दिलासादायक! तब्बल ३ महिन्यांनी जालन्यात रुग्णसंख्या शंभरच्या आत
- ‘कोरोनामहामारीतही स्त्रियांवर अत्याचार सुरू आहेत, लोकांचे खुन होताहेत, तिथे दाखवा खाकीचा ज़ोर’
- राजकीय स्वार्थासाठी छत्रपतींवर दबाव टाकण्याचे पाप चंद्रकांत पाटलांनी करू नये – कॉंग्रेस


