Share

मुंबई : मराठा क्रांती मोर्चाकडून निदर्शने

Published On: 

मुंबई : मराठा आरक्षणासह प्रलंबित मागण्यांसाठी बीडमधील परळीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी बेमुदत ठिय्या आंदोलनाची हाक दिली आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानात शुक्रवारी धरणे दिले. येथे जमलेल्या कार्यकर्त्यांनी दुपारी गोवंडी येथील पांजरपोळ याठिकाणी गोवंडी सर्कल येथे सरकारविरोधात निदर्शने केली.

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चा सोलापूर शाखेच्यावतीने सोलापूरातील शिवाजी चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याच पहायला मिळाले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी दोन एसटी गाड्यांची तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या दुसऱ्या पर्वाला तुळजापूरातून सुरूवात झालेली असून त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास सोलापूर शहर व जिल्ह्यातील मराठा समाज बांधवानी चक्काजाम आंदोलन केले़.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेधही करण्यात आला़ या मोर्चानंतर मराठा समाजातील कार्यकर्त्यांना शहर पोलीसांनी ताब्यात घेतले़.

काय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या मागण्या
मराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.
मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.
राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.
आण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.

‘मराठा समाजातील तरुणाचा संयम संपतोय ; कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो’

शरद पवारांना प्रत्युत्तर देण्यास तयार रहा ; भाजपच्या सोशल मिडिया कार्यकर्त्यांना अमित शहांंचे आदेश

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!