🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माने ‘द कपिल शर्मा शो’च्या माध्यमातून सर्वांना लोटपोट होऊन हसायला भाग पाडले होते. मात्र काही दिवसांसाठी कपिलचा शो ऑफ एअर गेला होता. मात्र पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी कपिलचा शो पुन्हा सुरु होणार आहे. विशेष बाब म्हणजे यंदाच्या शोमध्ये प्रेक्षकांना नवीन कलाकार पाहायला मिळणार आहेत.
द कपिल शर्माच्या आधीच्या शोमध्ये कृष्णा अभिषेक, किकू शारदा, भारती सिंह, सुमोना चक्रवर्ती, चंदन प्रभाकर आणि अर्चना पूरन सिंग यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. मात्र आता शोमध्ये आणखी नवीन कलाकारांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. कपिल शोमध्ये नव्या कलाकारांना देखील जागा मिळणार आहे.
याबद्दल कपिल शर्माने सांगितले की, मी कपिल शर्मा शोमध्ये नव्या कलाकारांचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आणि आनंदी आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या कलाकारांना भेटण्यासाठी मी फार उत्सुक आहे. तर कृष्णा अभिषेकने ईटाइम्सला सांगितले की, द कपिल शर्मा शोमध्ये मे मध्ये कमबॅक करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बाळासाहेबांचा शिवसैनिक उभा आहे, चौकशीची मागणी मीच करतोय- अरविंद सावंत
- सदाबहार, ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर !
- मराठा आरक्षण : अखेर मुख्यमंत्र्यांनी घेतली साष्टपिंपळगाव ग्रामस्थांची भेट
- बीड जिल्ह्यात लॉकडाऊनमध्येही होणार विद्यापीठाच्या परीक्षा
- शिमग्याला घरोघरी देवांची पालखी नेण्यास बंदी; होळीसाठी नियमावली जाहीर !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
