Share

ते केवळ ‘फेकू’ नाही तर ‘घाबरट’सुद्धा, कन्हैय्या कुमारची मोदींवर टीका

Published On: 

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीमेवर घुसखोरी झाली नसल्याचा दावा केल्याचं वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्यावर टीका केली जात आहे. यामध्ये आता विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमारने मोदींवर निशाणा साधला आहे. ‘कधीकाळी घर मी घुसकर मारेंगे म्हणणारे आज सत्तेत आल्यानंतर २० जवानांचे प्राण गेल्यानंतर घर मी काई घुसा ही नही’ असं म्हणत आहेत. ते केवळ ‘फेकू’ नाही तर ‘घाबरट’सुद्धा असल्याची टीका कन्हैय्या कुमारने केली आहे.

चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी जनतेला संबोधित केले आपल्या सीमेत कुणीही आलेलं नाही. आपली कोणतीही फौज दुसऱ्याच्या ताब्यात नाही. लडाखमध्ये आपले 20 वीर शहीद झाले. मात्र, ज्यांनी भारताकडे शत्रूच्या नजरेने बघितलं, त्यांना शिक्षा देऊन ते अनेक सैनिक अमर झाले. त्यांचं हे शौर्य आणि बलिदान प्रत्येक भारतीयांच्या मनात राहील, असं मोदी म्हणाले होते.

सगळ्यांनी हात वरकरून कस चालेल, कोणाला तरी जबाबदारी घ्यावी लागेल – आव्हाड

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते आणि गृहनिर्माण मंत्री यांनी देखील पंतप्रधानांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. चीनने आक्रमण केल्याचं पंतप्रधान मानायला तयार नाहीत. सीमेवर २० सैनिक मारले जाणं हे कमी नाही. १९६७ नंतर आजवर एकाही भारतीय सैनिकाला चीनच्या सीमेवर प्राण गमवावे लागलेले नाहीत. सर्वांनी हात वरकरून चालणार नाही, कोणी तरी जबाबदारी स्वीकारावी लागेल, असं आव्हाड यांनी केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!