🕒 1 min read
नवी दिल्ली : एसएस राजामौली यांचा RRR हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दररोज यशाचे नवे रेकॉर्ड बनवत आहे. RRR च्या हिंदी व्हर्जनने रिलीजच्या अवघ्या पाच दिवसात 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. त्याचबरोबर या चित्रपटाने जागतिक स्तरावर 500 कोटींची कमाई केली आहे. राजामौली यांच्या सिनेमॅटिक व्हिजनने आणि त्यांनी पडद्यावर ज्याप्रकारे कथा चित्रित केल्या आहेत त्यामुळे इंडस्ट्री पुन्हा एकदा प्रभावित झाली आहे. आता कंगनाने सोशल मीडियावर राजामौली यांच्या स्तुतीसाठी एक स्टोरी टाकली आहे, ज्यामध्ये तिने दिग्दर्शकाला सिनेमाच्या इतिहासातील महान फिल्ममेकर म्हटले आहे.
कंगनाने इंस्टा स्टोरीमध्ये लिहिले की, एसएस राजामौली यांनी हे सिद्ध केले की ते भारताचे महान चित्रपट निर्माता आहेत. त्यांनी आतापर्यंत एकही अयशस्वी चित्रपट दिलेला नाही. पण, त्यांच्याबद्दलची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे यश नाही, तर एक कलाकार म्हणून त्यांची नम्रता, एक व्यक्ती म्हणून त्यांचा साधेपणा आणि त्यांचे देश आणि धर्मावरील प्रेम. कंगनाने स्वतःला त्यांची खूप मोठी फॅन असल्या सांगितले. कंगनाने पुढे लिहिले की, ती कुटुंबासोबत हा चित्रपट पाहणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
काय सांगता! यशने स्वत: लिहलेत ‘केजीएफ चॅप्टर २’ मधील संवाद
“…प्रवीण दरेकर चोर है” – आम आदमी पार्टी दरेकरांविरोधात आक्रमक
वरुण धवन आणि जान्हवी कपूर करणार ‘बवाल’ पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र
IPL 2022: ‘तुला अजून एक सीजन कॅप्टन बनायचे नाही का?’; कॉनवेच्या प्रश्नाला धोनीने दिले ‘असे’ उत्तर
“भाजपला निवडणुकीत केजरीवालांचा पराभव करता आला नाही म्हणून…”, ‘त्या’ घटनेवरून ‘आप’ चा संताप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
