Share

काय सांगता! यशने स्वत: लिहलेत ‘केजीएफ चॅप्टर २’ मधील संवाद

Published On: 

मुंबई : बंगळूर येथे आयोजित केजीएफ चॅप्टर २चा मेगा ट्रेलर लॉन्च इव्हेंट पार पडला. यावेळी केजीएफ चॅप्टर २ च्या संपूर्ण कलाकारांनी या कार्यक्रमात त्यांचे अनुभव शेअर केले. चित्रपटात दाखवलेली अप्रतिम सिनेमॅटोग्राफी, जबरदस्त अॅक्शन आणि कुशल दिग्दर्शन पाहून प्रेक्षक वेडे झाले आहेत.

दक्षिणेचा रॉकिंग स्टार यशच्या चाहत्यांनी रॉकीच्या ‘लार्जर दॅन लाईफ’ कॅरेक्टरवर जबरदस्त प्रतिक्रिया देऊन सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. या कार्यक्रमाच्या वेळी दिग्दर्शक प्रशांत नील यांनी एक वेगळीच वस्तुस्थिती यावेळी उघड केली आहे. या केजीएफच्या सिक्वेलमध्ये अत्यंत प्रभावीपणे यश हा संवाद बोलताना दिसतो. तर दिग्दर्शकाने सांगितले की, या चित्रपटातील सर्वाधिक संवाद हे स्वत: यशने लिहले आहेत.

14 एप्रिल रोजी देशभरात कन्नड, तेलुगु, हिंदी, तमिळ आणि मल्याळममध्ये केजीएफ चॅप्टर २ रिलीज होणार आहे. हा चित्रपट प्रशांत नील यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. प्रशांत नील हे सध्या सर्वात जास्त मागणी असलेल्या दिग्दर्शकांपैकी एक आहे. हा चित्रपट उत्तर भारतातील रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या एक्सेल एंटरटेनमेंट आणि एए फिल्म्सद्वारे सादर केला जात आहे. एक्सेलने ‘दिल चाहता है’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’, ‘दिल धडकने दो’ आणि ‘गली बॉय’ सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

वरुण धवन आणि जान्हवी कपूर करणार ‘बवाल’ पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र
IPL 2022: ‘तुला अजून एक सीजन कॅप्टन बनायचे नाही का?’; कॉनवेच्या प्रश्नाला धोनीने दिले ‘असे’ उत्तर
“भाजपला निवडणुकीत केजरीवालांचा पराभव करता आला नाही म्हणून…”, ‘त्या’ घटनेवरून ‘आप’ चा संताप
अरविंद केजरीवालांच्या घरावर भाजप कार्यकर्त्यांचा हल्ला; गेटवर भगवा रंग टाकत तोडफोड
Pak vs Aus: बाबर आझमने ODI मध्ये रचला नवीन रेकॉर्ड ; विव रिचर्ड्स आणि विराट कोहलीला सोडले मागे!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!