Share

कंगणाने तिची लढाई पाकिस्तान नावाशिवाय लढावी,पाकिस्तानी पत्रकाराचा कंगणाला सल्ला

Published On: 

मुंबई: कंगणा रणौतच्या बातम्या काही थांबण्याचं नाव घेत नाहीये, महाराष्ट्रात आणि देशात आतापर्यंत कंगणा रणौतचं प्रकरण गाजत असताना आता पाकिस्तानमधून कंगणावर प्रतिक्रिया येत आहेत.बॉलिवूड अभिनेत्री कंगनाने मुंबईची तुलना पाकिस्तानसोबत केली. त्यानंतर आपली लढाई पाकिस्तानच्या नावाशिवाय लढ असा सल्ला पाकिस्तानच्या पत्रकार मेहर तरार यांनी दिला आहे.अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील कलाकार, दिग्दर्शकांसोबत पंगा घेणाऱ्या कंगनाने महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महापालिकेसोबतही वाद सुरू केला आहे.

मुंबईला आधी पाकव्याप्त काश्मीर आणि मुंबई महापालिकेच्या कारवाईनंतर पाकिस्तान असे संबोधणाऱ्या कंगनावर नेटिझन टीका असताना आता पाकिस्तानमधूनही कंगनाला सल्ला देण्यात आला आहे. कंगनाने आपली लढाई पाकिस्तानशिवाय लढावी, असा सल्ला पत्रकार मेहर तरारने दिला आहे.

मुंबईचा उल्लेख पाकव्याप्त काश्मीर असा केल्यानंतर कंगनाविरोधात राज्यभरात वातावरण तयार झाले. तिच्या या उल्लेखामुळे राजकीय खडाजंगीही झाल्या. त्यानंतर कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तोडल्यानंतर कंगनाने पाकिस्तान असे म्हणत कारवाईचे फोटो ट्विट केले. त्यामुळे कंगनाविरोधातील रोषात आणखीच भर पडली. यावर पाकिस्तानची पत्रकार मेहरने ट्विट करत कंगनाला सल्ला दिला. आपली राजकीय अथवा इतर मुद्यावरील लढाई ही पाकिस्तानच्या नावाशिवाय लढायला हवी असे ट्विट करत मेहरने कंगनाला सल्ला दिला.

सुनंदा पुष्करमुळे चर्चेत :

काँग्रेस नेते शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला होता. त्याआधी सुनंदा यांनी पाकिस्तानच्या पत्रकार मेहर तरारवर आरोप करत थरूर यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याचा आरोप केला होता.

दरम्यान, मुंबईबद्दल केलेल्या अपमानास्पद वक्तव्यानंतर शिवसेना व कंगना राणावत यांच्यात सुरू झालेल्या वादाची दखल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली आहे.

मुंबई महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयावर घाईघाईनं केलेल्या कारवाईला राज्यपालांनी आक्षेप घेतला आहे. हे प्रकरण चुकीच्या पद्धतीनं हाताळण्यात आल्याचं राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना कळवलं आहे. राज्यातील अनेक घडामोडींमध्ये बारकाईनं लक्ष घालणाऱ्या राज्यपालांनीही आता या वादात उडी घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांना तातडीनं राजभवनात बोलावून राज्यपालांनी नाराजी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

‘आस्ते घ्या, भावनिक होवू नका’; शरद पवारांचा मुंबईच्या पोलिस आयुक्तांना सल्ला

विद्यापीठाच्या निर्णयात स्पष्टता नसून फक्त गोंधळ, ऑनलाइन परिक्षा देणार कशी- कमलाकर शेटे

..तर सरकारला जबर किंमत मोजावी लागेल! खासदार संभाजीराजे छत्रपतींचा इशारा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!