पुणे:- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाराष्ट्र सरकार व यूजीसी आता परिक्षा घेत आहे.या परिक्षांसंदर्भात एक परिपत्रक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जारी केले आहे. अंतिम वर्षांच्या आणि बँकलॉकच्या परिक्षांसंदर्भात यामध्ये माहिती देण्यात आली आहे. पण आता यामध्ये अधिक स्पष्टता नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला असून यावर आता टिका होताना दिसत आहे.
यावर कमलाकर शेटे यांनी प्रश्न उपस्थित करताना या परिक्षा द्यायच्या कशा? लाईट गेली तर? नेटवर्क कनेक्टिव्हिटी नाही, सर्वर डाऊन झाला तर? परीक्षा होणार कशा,विद्यापीठाच्या निर्णयात स्पष्टता नसून फक्त गोंधळ, ऑनलाइन परिक्षा देणार कशी असा सवाल युवक क्रांती दलाचे पुणे शहर उपाध्यक्ष कमलाकर शेटे यांनी उपस्थित केला आहे.
अंतिम सत्रातील परीक्षा MCQ द्वारे घेण्यात येणार आहे. परंतु यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. बहुतांश विद्यार्थ्यांकडे अभ्यासाचे साहित्य उपलब्ध नाही त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून अभ्यास झालेला नाही. त्यामध्ये परीक्षा ही पारंपरिक पद्धतीने न घेता अचानक MCQ पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यामुळे अभ्यास करण्यास साहित्य नाही, वेळ खूप कमी आहे, प्रश्नसंच उपलब्ध नाही तसेच कोणत्याही निर्णयात स्पष्टता नसून गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामध्ये ऑनलाइन परीक्षा घेणार आहेत त्यात नवनवीन अवघड फतवे काढत आहेत.
एक एक दिवस वाया जात असून याकडे ना सरकारचे लक्ष आहे ना कुलगुरूंचे ना, विरोधी पक्षांचे ना इतर कोणाचेही. जर ऑनलाइन परीक्षा देताना सर्वर डाऊन झाला, इंटरनेट बंद झाले, लाईट गेली तर अशा वेळेस काय करणार? ऑफलाईन परीक्षा कशी होणार याबाबत स्पष्टता नाही, जर ही परीक्षा परीक्षा केंद्रावर घेतली तर तेथे कोरोना होणार नाही का? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ऑपशन अर्जसुद्धा भरला जात तेथे ऑनलाइन परीक्षा कशी देणार? अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत परंतु ना याची उत्तरे मिळतात ना कोण कॉल घेत आहेत.
यामध्ये विद्यार्थ्यांना आणखीही मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास होत आहे. फक्त आता रस्स्यावर उतरून आंदोलन करण्याचाच पर्याय उरला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे मरण मात्र कायमच आहे. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी आम्ही विद्यापीठाचे कुलगुरू नितिन करमळकर आणि कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही.
महत्वाच्या बातम्या:-
आरबीआयच्या मोरटोरियम योजनेवर 28 सप्टेंबरला पुन्हा सुनावणी
आशुतोष काळे यांना एकच काम, खोटे बोल पण रेटून बोल: विवेक कोल्ह
आता मूक मोर्चे नाहीच… आता संघर्ष अटळ, नितेश राणे आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

