Share

कंगना रानौतवर चोरी केल्याचा आरोप 

Published On: 

मुंबई : बॉलिवूड क्वीन अभिनेत्री कंगना रनौतआता लवकरच ‘मणिकर्णिका रिटर्न्स’मध्ये दिसणार आहे. ‘मणिकर्णिका’ मध्ये झांसीच्या राणीची कथा दाखवली गेली होती. तर या आगामी ‘मणिकर्णिका रिटर्न्स’ या चित्रपटात काश्मीरच्या राणी कथा दाखवण्यात येणार आहे. चित्रपट निर्माते कमल जैन यांच्यासोबत फोटो शेअर करत कंगना रानौतने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.

कमल जैन सोबतचा फोटो शेअर करताना कंगनाने लिहिले की, ‘झाशीच्या राणीसारख्या अनेक वीरांगनांच्या शौर्याचा साक्षी आपला भारत देश आहे. अशीच आणखी एक समोर न आलेली वीर कथा म्हणजे काश्मीरच्या राणीची, ज्यांनी महमुद गजनवीला एकदा नव्हे तर दोनदा पराभूत केले. लवकरच कमल जैन आणि मी ‘मणिकर्णिका रिटर्न्स: दि लिजेंड ऑफ दिद्दा’ प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहोत.’ पण चित्रपटाच्या घोषणेनंतर कंगणावर चोरीचा आरोप झाला आहे. कंगणाने या चित्रपटाची कथा चोरल्याचा आरोप ‘दिद्दा’चे लेखक आशिष कौल यांनी केला आहे.

कौल यांनी कंगना राणावत हिच्यावर कॉपीराइटचा आरोप केला आहे. ते म्हणाले, की स्वतः च्या हक्कांसाठी संघर्ष करणारी कंगणा माझ्यासारख्या लेखकाच्या हक्कांचे उघडपणे उल्लंघन करत आहे. कंगणाने कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केले असून हे बेकायदेशीर आहे. मला कंगणाचे वागणे समजले नाही. मी याला बौद्धिक चोरी म्हणेल. कंगणा हा दावा करू शकते, की ‘दिद्दा’ हे एक ऐतिहासिक पात्र आहेच परंतु दिद्दाबद्दल जगातील कोणत्याही इतिहासकारांनी फारसे काही लिहिले नाही. याला फक्त अपवाद फक्त इतिहासकार कल्हान आहेत. इतर कोणत्याही इतिहासकाराने काश्मीरची राणी दिद्दावर मोजून दोन पानेही लिहिली नाहीत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!