🕒 1 min read
मुंबई : प्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना राणावत विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. यावर अंधेरी कोर्टातने १४ सप्टेंबर रोजी कंगना न्यायालयात उपस्थित राहीली नाही. त्यावर पुढील सुनावणीला कंगना गैरहजर राहिल्यास अटक वॉरंट काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर आजच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात हजर झाली आहे.
मागील सुनावणी दरम्यान, कंगनाचे वकील रिझवान सिद्दिकी यांच्याकडून सांगण्यात आले होते की, कंगनाला कोरोनाची लक्षणं आढळली असून कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप रिपोर्ट आले नसल्याचे सांगण्यात आले होते. त्यावर जावेद अख्तर यांचे वकील जय भारद्वाज यांच्याकडून आक्षेप नोंदवण्यात आला. यावर भारद्वाज यांनी गेल्यावेळी देखील कंगना पुढील सुनावणीस उपस्थित राहील सांगत गैरहजर राहण्याची मुभा देण्यात आली होती याकडे लक्ष वेधलं होते.
दरम्यान, कंगनाने एका मुलाखतीमध्ये जावेद अख्तर याच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यावरच जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना रानावत विरोधात अंधेरी न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणी आता पुढील सुनावणी १५ नोव्हेंबरला होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
- पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरींदर सिंग यांनी ‘एनडीए’मध्ये यावे – रामदास आठवले
- कुटुंबांवर केलेले आरोप बिनबुडाचे, सोमय्यांच्या सीए पदवीवरच मला शंका-हसन मुश्रीफ
- पंजाबमध्ये असणार आता दोन उपमुख्यमंत्री; नवज्योतसिंग सिद्धूंच्या सहमतीनेच मुख्यमंत्र्यांची निवड
- मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने चेन्नईला सावरलं; झुंजार अर्धशतक पूर्ण
- ‘मला गृहमंत्र्यांना विचारायचं, तुम्ही कोणत्या अधिकाराअंतर्गत गणेश विसर्जनापासून रोखलं?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
