🕒 1 min read
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी कांचन गिरी आणि सुर्याचार्य दोघे मुंबईत दाखल झाले होते. याप्रसंगी कांचन गिरी यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्रांचा वर्षाव केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले वडील बाळासाहेब ठाकरेंचं नाव बुडवलं आहे, असे मत व्यक्त केले आहे. यावरून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी साध्वी कांचनगिरी यांच्यावर निशाणा साधला आहे.
याबाबत किशोरी पेडणेकर म्हणल्या की, ‘बाळासाहेबांच्या पुत्राने रामजन्मभूमी येथे जाऊन ज्या पद्धतीने काम केले तेव्हा या कांचनगिरी कुठे होत्या? मुळात अशी प्रगती पुस्तक द्यायचा यांना काय अधिकार? उत्तर प्रदेश, बिहारमधील हिंदुवर अन्याय होत होता. तेव्हा या कांचनगिरी होत्या कुठे?, तुम्हाला ज्यांच्या धुरा चालवायच्या आहेत त्या चालवा कारण कोणी कुणासाठीही येऊन उभा राहू शकतं. पण बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्रावर अशा पद्धतीने महाराष्ट्रात येऊन प्रश्नचिन्ह उभे करण्याचा अधिकार कांचनगिरी यांना नाही,” असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणत कांचनगिरी यांना प्रतिउत्तर दिले आहे.
कांचन गिरी म्हणाल्या होत्या की,’उद्धव ठाकरे यांच्यावर मला काहीही बोलायचं नाही, कारण त्यांनी आपले वडील बाळासाहेब ठाकरे यांचं नाव बुडवलं आहे. बाळासाहेब ठाकरे जे बोलायचे ते करत होते. ते हिंदूवादी होते. बाळासाहेब वाघासारखे हिंदूंसाठी बोलायचे. पालघरमध्ये जे हत्याकांड झालं तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आपले डोळे आणि कान दोन्ही बंद केले होते.’ यावरून किशोरी पेडणेकर यांनी कांचन गिरी यांना सुनावले.
महत्वाच्या बातम्या
- ‘ब्लड प्रेशर आणि डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता म्हणून मी गृहमंत्री नाकारले’
- ‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला ;हे’ भोगावं लागतंय; काँग्रेसची मोदींवर वादग्रस्त टीका
- पेट्रोल-डिझेल सस्ता चाहीए की नहीं? विचारत सत्ता मिळवली; इंधन दरवाढीवरुन राऊतांचा मोदींना टोला
- पवार साहेब, हर्बल तंबाखूच्या उत्पादनाला परवानगी द्या, शेतकरी श्रीमंत होईल- सदाभाऊ खोत
- ‘रवी राणांनी जे केलंय ते चिल्लरगिरी, स्वतःला शेतकऱ्यांचं कैवारी समजतात आणि पदोपदी नौटंकी’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
