टीम महाराष्ट्र देशा : आमचे सरकार आल्यानंतर आम्ही अधिकाऱ्यांना कोंबडा बनवू, असं वादग्रस्त विधान भाजपाचे महासचिव आणि पश्चिम बंगालमधील पार्टीचे प्रदेशाध्यक्ष कैलाश विजयवर्गीय केले आहे. कैलाश विजयवर्गीय यांनी पश्चिम बंगालमधीलअधिकाऱ्यांना धमकी दिली आहे. शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या पुरुलियामधील एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं.
या कार्यक्रमात बोलताना पुढे ते म्हणाले की, आमचे सरकार आल्यानंतर आम्ही अधिकाऱ्यांना कोंबडा बनवू, तर ज्यांना कोंबडा बनवायचा आहे, अशा सर्व अधिकाऱ्यांची आम्ही यादी तयार केली आहे. तसेच, सरकारी अधिकाऱ्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास आम्ही शांत बसणार नाही. आम्ही सुद्धा बांगड्या घातल्या नाहीत. आम्ही इमानदारीने काम करत आहोत, याचा अर्थ असा नाही की आम्हाला मर्यादा तोडता येत नाहीत.
या घटनेचा व्हिडीओ लोकांसमोर आला आहे. यामध्ये ज्यावेळी भाजपाचे सरकार सत्तेत येईल, त्यावेळी भाजपाचा मुख्यमंत्री होईल. जे अधिकारी आता चमचेगिरी करत आहेत, भ्रष्टाचार करता आहेत, आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देत आहेत. त्यांची यादी तयार होत आहे. त्यांची यादी तयार झाल्यानंतर शोलेमधील तोच डायलॉग असले की अब तेरा क्या होगा कालिया.
दरम्यान, कैलाश विजयवर्गीय हे इंदूरचे विभागीय आयुक्त आकाश त्रिपाठी यांची भेट घेणार होते. मात्र, त्यांनी भेटण्यास नकार दिला. त्यावर आकाश त्रिपाठींना धमकी देताना म्हणाले होते,’ अधिकारी आहात म्हणून नाहीतर इंदूरला आग लावली असती. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
