टीम महाराष्ट्र देशा : राहत्या घरासमोरून अवघ्या १७ मिनिटात चोरट्यांनी महागडी फॉर्च्युनर पळवल्याची घटना पुण्यात घडली आहे. कार चोरी करतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस समर्थक नगरसेवक रवींद्र धंगेकर यांची फॉर्च्युनर कार चोरट्यानी चोरून नेली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुरवातीला चोरट्यानी राजवर्धन कसबा पेठेतून शितोळे यांची कार चोरी केली. त्यानंतर चोरटे त्याच कारने तोफखाना येथील धंगेकर यांच्या घराजवळ आले आणि त्यांनी धंगेकर याचीदेखील कार चोरी केली. केवळ १७ मिनिटांमध्येच त्यांनी ही चोरी केली.
या घटनेची सर्वत्र एक चर्चा सुरु असून याप्रकरणी फरासखाना व शिवाजीनगर पोलिस तपास करत आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

