औरंगाबाद : महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्प व मार्गदर्शनाखाली सिल्लोड- सोयगाव मतदारसंघात जम्बो कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या शिबिरात नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या विशेष लसीकरण मोहिमेत ९० हजारांचा टप्पा पार केला असून मोहिमेत १ लाखापर्यंत लसीकरणाची वाटचाल सुरू आहे. सिल्लोड शहर व तालुक्यात आता १ लाख ६१ हजार पेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण झाले आहेत. तर सोयगाव तालुक्यात देखील आता पर्यंत ५१ हजार ६०० पेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
मतदार संघातील लसीकरण कार्यक्रमातील हा आतापर्यंतचा विक्रम असून मतदारसंघातील लोकप्रतिनिधी, प्रमुख कार्यकर्ते, गावकरी व प्रशासकीय यंत्रणेतील सर्व घटकांच्या परिश्रमाचे हे फलित आहे. असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता मतदारसंघात आता १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट असून यासाठी सिल्लोड – सोयगाव मतदारसंघात लसीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही देत नियमित लसीकरणाची प्रक्रिया सुरूच राहणार असल्याने १८ वर्षावरील प्रत्येक नागरिकाने कोरोना लस घ्यावी असे आवाहन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे.
लस उपलब्ध असूनही नागरिकांमध्ये लस घेण्याबाबत उलट सुलट अफवा पसरल्याने लोक लस घेण्यास पुढे येत नव्हते. यावर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी गावागावांत जावून नागरिकांना लसीकरणाचे महत्व पटवून दिले. तसेच विविध धर्माचे धर्मगुरू, प्रमुखांच्या भेटी घेवून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता १८ वर्षावरील प्रत्येकाने लस घेण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला साद देत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने या मोहिमेत सहभागी होवून लसीकरण केले. सुरुवातीला २ व ३ सप्टेंबर अशी २ दिवस असणारी ही मोहीम नागरिकांचा लसीकरणाबाबत असलेला उत्साह पाहून आणखी दोन दिवस वाढविण्यात आली होती. या लसीकरण मोहिमेत सिल्लोड – सोयगाव मतदारसंघात रेकॉर्ड ब्रेक लसीकरण झाले.
महत्त्वाच्या बातम्या
- पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन निर्णयाचे मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन – राजू शेट्टी
- ‘करुणा शर्मांविरुद्ध कटकारस्थान ; एखादा मंत्रीच जर अन्याय, अत्याचार करत असेल तर…’
- गेल ऑम्व्हेट यांचे पुण्यात स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करणार – रामदास आठवले
- औरंगाबाद ग्रामीण भागात पाचवी ते सातवीच्या वर्गांची घंटा वाजली!
- राष्ट्रवादीच्या आजी – माजी आमदारांची महत्वाची बैठक बुधवारी; शरद पवार स्वतः घेणार आढावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

