Share

पत्रकार पांडुरंग रायकर यांच निधन हलगर्जीपणामुळे; पालकमंत्री अजित पवार यांचे चौकशीचे आदेश

Published On: 

पुणे :  Tv9 चे पुण्यातील  पत्रकार पांडुरंग रायकर यांच कोरोनामुळे निधन झाल आहे. मागील काही दिवसांपासून ते कोरोनाग्रस्त होते आणि त्यांच्यावर नव्यानेच उदघाटन करण्यात आलेल्या जम्बो रुग्णालयात उपचार सुरू होते.

त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने नातेवाईकांनी आणि पत्रकारांनी त्यांना उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यासाठी प्रयत्न केला, तेव्हा त्यांना रुग्णवाहिका मिळू शकली नाही.सुरुवातीला दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून रुग्णवाहिका उपलब्ध आहे,असं सांगण्यात आलं आणि नंतर रुग्णवाहिका आलीच नाही. त्यांना व्हेंटिलेटरही मिळू शकलं नाही.

अहमदनगर जिल्ह्यातील दुकानदारांसाठी खुशखबर… दुकाने खुली ठेवण्याबाबत नवी नियमावली

आता प्रशासन व्यवस्थेवर फार मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून सरकार करोनाकाळात करोनारुग्णांबाबत किती गंभीर आहे याच हे उदाहरण आहे. सध्या सरकार प्रशासन आणि व्यवस्था यावरच काम करत असताना अशा पद्धतीने पत्रकारांंचे बळी जाणार असतील तर हे प्रशासनाचे अपयश आणि गलथानपणा आहे.जर जनतेचा आवाज उठवणार्या पत्रकारांवर ही दुर्दैवी वेळ येत असेल तर सामान्य जनतेची काय अवस्था असेल याची कल्पनाच न केलेली बरी!

पुण्यात गलथान प्रशासनाचा कारभार उघडकीस! पत्रकाराच्या बळीनंतर, सरकार आता तरी डोळे उघणार का?

पुण्यातील रुग्णालयात करोनाची रुग्णसंख्या ही सातत्याने वाढत आहे.या अशा संकटात पुणे महापालिका, प्रशासन आणि राज्य सरकार ज्या पद्धतीने त्याचा सामना करत आहेत, यावरुन लोकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.  ही घटना घडल्यानंतर आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या घटनेत हलगर्जीपणा झाला असून याची चौकशी व्हावी यासाठी विभागीय आयुक्त सौरव राव यांना आदेश दिले आहेत.

व्यवस्थेने बळी घेतला… मिस यु पांडुरंग ! Tv9 मराठीच्या पत्रकाराचे कोरोनाने निधन

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!