पुणे : कोरोनाने गेले ५ महिने राज्यासह देशभरात थैमान घातले आहे. याकाळात सरकार व प्रशासन हे पूर्णपणे अक्षम असल्याचे अनेक दावे स्थानिक प्रशासन ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मात्र, आता पुन्हा एकदा सरकारचा गलथानपणा समोर आला आहे. या कोरोना काळात सत्य परिस्थिती जनतेसमोर पुढे आणण्यासाठी झटणाऱ्या पत्रकार पांडुरंग रायकर यांचं आज पहाटे कोरोनाने निधन झालं आहे.
त्यांच्या मृत्यूला व्यवस्था जबाबदार असल्याचे समोर येत असून आता संताप व्यक्त केला जात आहे. ई-टीव्ही मराठी, एबीपी माझा ते टीव्ही ९ मराठी असा त्यांचा पत्रकारितेतील १५ वर्षांचा हा प्रवास हलगर्जीपणामुळे संपला! काल रात्री त्यांची प्रकृती खालावल्यानंतरची घटना संतापजनक आहे. तर, खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुण्यासारख्या शहरात या महामारी काळात अजूनही रुग्णांची आपत्कालीन व्यवस्था सक्षम नसल्याचे उघडकीस आले आहे.
व्यवस्थेने बळी घेतला… मिस यु पांडुरंग ! Tv9 मराठीच्या पत्रकाराचे कोरोनाने निधन
20 ऑगस्टला त्यांना थंडी ताप सुरू झाला होता, त्यानंतर रायकर यांनी डॉक्टरांकडे जाऊन उपचार सुरू केले. २७ तारखेला त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आणि त्यानंतर ते आपल्या गावी म्हणजे कोपरगावला गेले. मात्र त्यांना तिथेही त्रास जाणवत होता, त्यांनी कोपरगावातच एंटीजन टेस्ट केली आणि ती पॉझिटीव्ह आली. त्यानंतर त्यांना अँबुलन्सने पुण्यात आणण्यात आलं आणि जम्बो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
यानंतर, काल (दि. १ सप्टेंबर) रोजी रात्री प्रकृती अधिक खालावली. त्यांची ऑक्सिजन लेव्हल ७८ पर्यंत खाली आली आहे. यानंतर, त्यांना दुसऱ्या रुग्णायात हलवण्याचे प्रयत्न सुरु झाले. जम्बो रुग्णालयातून दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयात हलवण्यासाठी त्यांना कार्डिऍक ऍम्ब्युलन्सची आवश्यकता होती. अशी ऍम्ब्युलन्स वेळाने जम्बो रुग्णालयात पोहोचली इतकेच काय तर त्यातील व्हेंटिलेटर खराब असल्याचं सांगण्यात आलं.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या मुलाला कोरोनाची लागण!
त्यामुळे पुन्हा रुग्णवाहिकेसाठी शोध सुरु झाला. रुग्णवाहिका उपलब्ध झाली पण त्यात डॉक्टर नव्हते. पहाटे नंतर पुन्हा रुग्णवाहिका मिळवण्यासाठी हालचाली करण्यात आल्या, पहाटे ५ वाजता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून रुग्णवाहिका उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं मात्र पहाटे साडे पाच वाजता त्यांचं निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यामुळे वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने आता गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

