Share

भारत बंदमध्ये सामील व्हा, राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्ण पाठिंबा; जयंत पाटील यांचे आवाहन

Published On: 

मुंबई : शेतकरीविरोधी तीन काळे कृषी कायदे व वीज क्षेत्राचे खासगीकरण विधेयक रद्द करावे. इंधनाचे दर कमी करून त्या जीएसटीच्या कक्षेत आणावे. स्वामीनाथन समितीच्या शिफारसीनुसार सर्व शेतीमालाला आधारभूत किमती व सरकारी खरेदीची हमी देणारा कायदा करावा, यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी सोमवारी (दि. २७) संयुक्त किसान कामगार मोर्चाच्या वतीने भारत बंदची घोषणा केली आहे.

दरम्यान आता याला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने सकरात्मक प्रतिसाद दिला आहे. देशातील विविध संघटनांनी येत्या 27 सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या बंदला पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा या भारत बंदला संपूर्ण पाठिंबा असणार असून या बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असं आवाहन जयंत पाटील यांनी केलं आहे.

जयंत पाटील यांनी परभणीत आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हे आवाहन केलं. देशभरातील 100 पेक्षा जास्त संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हा बंद चालणार आहे. या बंदला आमचा पाठिंबा असून आम्ही बंदमध्ये सहभागी होऊ, असं पाटील यांनी सांगितले आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!