Share

बाबासाहेबंपेक्षा तुमचा लढा मोठा आहे का ? कवाडेंचा आंबेडकरांना सवाल

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते जोगेंद्र कवाडे यांनी सडकून टीका केली आहे. त्यांनी एक वृत्तवाहिनीशी बोलताना बाबासाहेबांच्या विचारांनी चालणारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असताना वेगळी चूल मांडण्याची काय गरज असा प्रश्न उपस्थित केला आहे.

जोगेंद्र कवाडे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा वंचितांचा पक्ष आहे. हा पक्ष बळकट करण्याऐवजी तुम्ही जी वेगळी चूल मंडळी आहे त्याची गरज आहे का ? बाबासाहेबांच्या विचारांपेक्षा तुमचा लढा मोठा आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच तुमच्याकडे येणारी लोकं ही संधीसाधू मंडळी आहे. सत्तेसाठी स्वार्थी मंडळी आहे असं विधान केले आहे.

पुढे बोलताना लोकसभेत वंचित आघाडीमुळे कुणाला फायदा झाला? हे जनतेला माहित आहे. रिपब्लिकन पक्ष हा वंचिताचा प्रश्न नाही का? या पक्षात कोण आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसेच तुम्ही विधानसभेसाठी उमेदवारांची नावे जाहीर करताना जातीचा उल्लेख करण्याची गरज नसल्याचही जोगेंद्र कवाडे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मते मिळवून प्रश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची ताकद दाखवून दिलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीतही वंचित आपली कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न करणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1178150489738772480?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1177955985916170240?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1177949316888981505?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!