टीम महाराष्ट्र देशा: कोरोना महामारीमुळे देशात बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. विविध क्षेत्रांमध्ये बेरोजगारी बद्दल बोलले जात असताना विविध आस्थापनांमध्ये नोकरीच्या संधी देखील मिळत आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवत आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांच्या आस्थापनेवरील रिझोल्व्हर पदांच्या एकूण ४७ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
SBI मध्ये रिझोल्व्हर पदांच्या एकूण ४७ जागा
स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर रिझोल्व्हर पदांच्या एकूण ४७ जागा भरण्यासाठी पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवाराची भारतामध्ये कुठल्याही स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये पोस्टिंग होऊ शकते.
शैक्षणिक पात्रता
स्टेट बँक ऑफ इंडिया रिझोल्व्हर पदांच्या एकूण ४७ जागा भरण्यासाठी पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवत आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी sbi.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
अर्ज सुरू होण्याची तारीख
दिनांक 10 ऑक्टोबर 2022 पासून इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
या पदांसाठी इच्छुक उमेदवार 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | मातोश्रीवर खलबतं! उद्धव ठाकरेंना प्रमुख विरोधक बनवण्याचं प्लॅनिंग
- Maharashtra Rain Update | राज्यात मराठवाड्यासह विदर्भात पावसाची जोरदार हजेरी
- Mulayam Singh | उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांचे निधन
- Chandrakant Khaire | शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर गुन्हा दाखल
- Shivsena | “… म्हणून काही गारद्यांना शिवसेनेवर घाव घालण्याची सुपारी दिल्लीने दिली”; शिवसेनेचा थेट आरोप


