Share

Uddhav Thackeray | मातोश्रीवर खलबतं! उद्धव ठाकरेंना प्रमुख विरोधक बनवण्याचं प्लॅनिंग

Published On: 

मुंबई – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात वारंवार अनेक घडामोडी होताना दिसत आहे. अशातच निवडणूक आयोगाने (Election Commision) देखील शिवसेना पक्षाचं चिन्ह असलेला धनुष्यबाण गोठवला आहे. यावेळी मातोश्रीवर प्लॅनिंग सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांना प्रमुख विरोधक बनवण्याचं प्लॅनिंग सुरु असल्याचं समोर आलं आले आहे.

उद्धव ठाकरे यांना देशपातळीवर विरोधक म्हणून ठेवण्याचं प्लॅनिंग –

शरद पवार (Sharad Pawar), ममता बॅनर्जी (Mamta Banarjee) यांसारख्या नेत्यांच्या रांगेत उद्धव ठाकरेंना देशपातळीवर विरोधक म्हणून ठेवण्याचं प्लॅनिंग मातोश्रीवर सुरु असल्याचं म्हटलं जातं आहे. उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातील जनतेची साहनुभूती मिळेल आणि ज्याप्रमाणे मुघलांच्या काळात मराठ्यांनी दिल्लीचं तख्त हादरवलं होतं, तसेच आव्हान आताच्या दिल्लीलाही मिळेल, असा दावा सेना नेत्याने केला आहे.

निवडणूक आयोगाकडून धक्का –

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का निवडणूक आयोगाने दिला आहे. शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह आता गोठवण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष आता अंधेरी पोटनिवडणूकीत धनुष्यबाण चिन्ह व शिवसेना हे नाव वापरू शकणार नाही. आयोगाच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. एवढंच नाही तर दोन्ही गटांनी नवीन नावं जाहीर करतानाच आयोगाने आणखीन एक धक्का देत शिवसेना हे नाव देखील गोठवलं आहे.

उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूल ही तीन चिन्हं उद्धव ठाकरे यांच्याकडून ठरवण्यात आली आहे. तसेच, शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रबोधनकार ठाकरे, ही नावं देण्यात आली होती. याबाबतची माहिती अरविंद सावंत यांनी दिली होती.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!