Share

‘चंद्रकांतदादा… पवार साहेबांबद्दल टीका करण्याआधी जनाची नाही पण मनाची तरी लाज बाळगा’

Published On: 

ठाणे : निसर्ग या चक्रीवादळाने कोकणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं आहे. या नुकसानाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज आणि उद्या कोकण दौऱ्यावर आहेत. काजू, फोफळी, आंबा, आणि नारळाच्या बागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे या भागातील नुकसानग्रस्तांकडून मदतीची मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर येथील लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्यापासून दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत.

मात्र शरद पवार यांच्या या दौऱ्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सडकून टीका केली आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते गेल्यानंतर 3 महिने घरात बसलेल्या मुख्यमंत्र्यांना बाहेर पडावं असं वाटलं. दुसरीकडे आता 4 दिवसांनंतर शरद पवार यांनाही कोकण दौरा करावासा वाटतोय, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली. तसेच या सरकारला नुकसानीचा अंदाजच आलेला नाही, असाही आरोप केला. ते कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

आता चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे. शरदचंद्रजी पवार साहेबांबद्दल चंद्रकांत पाटील दौऱ्यावर उशीर झाला असे म्हणाले… जणूकाही ते दौऱ्यावर तत्पर जाणारे गडी आहेत. आठवण म्हणून सांगतो. 1972 साली दुष्काळ पडला तेव्हा गावा-गावात पोहचले शरद पवार. 1993 चा बॉम्बस्फोट झाला आणि त्याचा धुराळा खाली उतरत नाही तर पवार साहेब जागेवर पोहचले. खिल्लारीचा भूकंप झाला… तिथल्या जिल्हाधिका-यांना कळण्याच्या आत पवार साहेब खिल्लारीत पोहचले. तेव्हा आपण कोणाबद्दल बोलतोय याचे भान तरी चंद्रकांत पाटलांनी ठेवावं. असा जोरदार टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.

तर, जेव्हा कोल्हापूर मध्ये पूर आला तेव्हा भाजपाचे नेते कुठे होते याचा शोध तर घ्यावा. असा सवाल करत त्याही परिस्थितीमध्ये स्वतः शरद पवार साहेब 2 फूट पाण्यामधून चालत अंगठ्याला जखम असताना देखील गेले. अशी आठवण करून द्यायला आव्हाड विसरले नाही.

वैद्यकीय पदव्युत्तर पदविकेच्या विद्यार्थ्यांचं गाऱ्हाणं ‘राज’पुत्रा दरबारी

दरम्यान, आपल्या 50 वर्षांच्या कारकर्दितीत जेव्हा-जेव्हा महाराष्ट्रावर नाही तर देशावर प्रसंग ओढवला तेव्हा मदतीला धावणारे शरद पवार साहेब आहेत. अगदी गुजरातच्या भुकंपात सुद्धा त्यांनी अभुतपुर्व काम केल आणि म्हणुनच स्व. अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख बनवल. आपल हेलिकॉप्टर गारा पडतायेत म्हणुन खाली उतरल्यानंतर त्याच अवस्थेत चिखल तुडवत द्राक्षे आणि डाळींबांच्या बागांमध्ये जाणारे शरद पवार साहेबच होते. तेव्हा त्यांना दौ-यावर उशीर झाला अस म्हणण हे आपल राजकीय प्रगल्भत्व सिद्ध करतं. अस देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

तर, कोव्हीड सारख्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत असताना स्वत:ला दाराच्या आत न-ठेवता, वय वर्षे 80 असताना देखील महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे, मुंबई मध्ये काय चालू आहे हे पाहण्यासाठी न-घाबरता बाहेर पडणारे ते एकमेव नेते आहेत. आजही सकाळी 8 वाजल्यापासून लोकांना भेटण्याची त्यांची दिनचर्या खंडीत झालेली नाही. म्हणुनच चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार साहेबांबद्दल टीका करण्याच्या आधी कमीत-कमी जनाची नाही पण मनाची तरी लाज बाळगा. असंही जितेंद्र वहाड म्हणाले.

नाभिक समाजाच्या प्रश्नांचे राजकारण होत असताना गिरीश बापटांनी केली थेट मदत

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!