मुंबई : वैद्यकीय पदव्युत्तर पदविकेच्या (Post Graduate Diploma) परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात यातही मनसे नेते अमित ठाकरेंनी प्रयत्न करावेत अशी मागणी घेऊन विद्यार्थ्यांच्या एका शिष्टमंडळाने अमित ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली आहे.
दरम्यान, वैद्यकीय पदव्युत्तर पदविकेच्या (Post Graduate Diploma) परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात कारण बहुतांश विद्यार्थी अहोरात्र ‘कोविड १९’ च्या वैद्यकीय सेवेत असल्यामुळे परीक्षा देण्याच्या तयारीत नाहीत. मनसे नेते अमित ठाकरेंनी यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानी केली आहे. त्यांनी मुंबईत अमित ठाकरे यांची भेट घेतली.
#corona: धक्कादायक! मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्तांचे कोरोनामुळे निधन
वैद्यकीय पदव्युत्तर पदविकेच्या (Post Graduate Diploma) परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात कारण बहुतांश विद्यार्थी अहोरात्र 'कोविड १९' च्या वैद्यकीय सेवेत असल्यामुळे परीक्षा देण्याच्या तयारीत नाहीत. मनसे नेते अमित ठाकरेंनी ह्यासाठी प्रयत्न करावेत; विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची मागणी. pic.twitter.com/NVPL8w0Z8F
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) June 9, 2020
दरम्यान, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी – 2020 परीक्षा कोविड-19 च्या टाळेबंदीमुळे अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रति कुलपती अमित विलासराव देशमुख यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची राजभवन भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या 15 जुलैपासून घेण्याची विद्यापीठाची तयारी आहे. तसा प्रस्तावही विद्यापीठाने दिला आहे. याबाबत आपण राज्यपालांना अवगत केले आहे असे अमित देशमुख यांनी सांगितले.
नाभिक समाजाच्या प्रश्नांचे राजकारण होत असताना गिरीश बापटांनी केली थेट मदत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

