पुणे : कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. आता या लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे. मात्र असे असले तरीही मुंबईच्या उपनगरातील सलून आणि ब्युटी पार्लर चालकांना अद्याप सरकारकडून दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.
राज्य सरकारने तातडीने आपल्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, या मागणीसाठी मुंबईसह उपनगरातील सलून आणि ब्युटी पार्लर चालकांनी येत्या 10 जून रोजी काळ्या फिती लावून आंदोलनाचा इशारा दिला आहे. लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई सलून ब्युटी पार्लर असोसिएशनतर्फे देण्यात आली आहे.
आता सलून सलून आणि ब्युटी पार्लर चालकांच्या लढ्याला भाजप आमदार प्रसाद लाड यांनी पाठींबा देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रोज टापटीप राहतात, ते नेमके कुठे दाढी-केस कापतात, हा एक प्रश्नच आहे, असा टोला भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि विधान परिषद आमदार प्रसाड लाड यांनी लगावला. राज्यात सलून-पार्लर बंद असल्याने नाभिक समाजावर अन्याय का? असा प्रश्न लाड यांनी विचारला आहे.
मात्र नाभिक समाजाच्या प्रश्नांवरून राजकारण होत असताना तिकडे पुण्यात भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी केश कर्तनालय व त्यातील रोजंदारीवरील काम करणाऱ्या कामगारांना धान्य किट व रोख निधी वाटप करण्यात आला आहे.
#corona: धक्कादायक! मुंबई महानगरपालिकेच्या उपायुक्तांचे कोरोनामुळे निधन
कोरोना संसर्गजन्य साथीच्या प्रादुर्भावामुळे सुरु असलेल्या लॉकडाउन मध्ये अनेक छोटे- मोठे उद्योग व्यवसाय बंद आहेत. त्यातील छोटे व्यवसायिक यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. शहराचा खासदार म्हणून शक्य होईल तेवढे मदत करण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यामध्ये यापूर्वी रिक्षाचालक कुंभार व इतर समाजातील गरीब नागरिकांना माझ्या मानधनातील रोख रक्कम व धान्य किटची मदत केली. अस गिरीश बापट यांनी सांगितल आहे.
तर पुणे शहरातील नाभिक समाजातील विविध प्रमुख कार्यकर्त्यांच्या मार्फत केश कर्तनालय व त्यातील रोजंदारीवरील काम करणाऱ्या कामगारांना धान्य किट व रोख निधी त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. अशी माहिती गिरीश बापट यांनी दिली आहे. यावेळी रत्नदीप खडके, रामदास सूर्यवंशी, महेश सांगळे, सुनील रसाळ, रवी मावडीकर हे उपस्थित होते.
मुंबई पोलिस विचारतायत ‘हाउज द डिस्टन्स’? ‘उरी’स्टाइलचे टि्वट करत जनजागृती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

