टीम महाराष्ट्र देशा : एमएमआरडीएमार्फत मेट्रो 3 साठी कारशेड बांधण्यात येणार असून त्यासाठी आरेतील 2646 झाडांची तोड करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला आहे. मात्र या प्रस्तावाला राज्यातील अनेक नेत्यांनी विरोध केला आहे. तसेच सत्तेत असलेल्या शिवसेनेने देखील वृक्षतोडीला प्रखर विरोध दर्शवला आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध करताना देशात हिटलरशाही असल्याची टीका केली होती. याचा उल्लेख शिवसेनेने सामना या मुखपत्रात देखील केला होता.यावरून जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मनले आहेत.
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केले आहे. आरेची झाडे कापल्यानंतर मी म्हणालो हे राज्य हिटलरच्या मार्गाने जात आहेत.नेमके तेच बोल सामनाच्या माध्यमातून शिवसेनेने म्हणजेच उद्धव ठाकरे यांनी काढले म्हणजे उद्धव ठाकरे यांना पण मान्य आहे कि हे राज्य हिटलरच्या मार्गाने जात आहे. #आभार पण त्याच बरोबर हिटलरला साथ देण सोडा एवढीच विनंती, अशा आशय या ट्विट मध्ये लिहिण्यात आला आहे.
आरेची झाडे कापल्यानंतर मी म्हणालो हे राज्य हिटलरच्या मार्गाने जात आहेत.नेमके तेच बोल सामनाच्या माध्यमातून शिवसेनेने म्हणजेच उद्धव ठाकरे यांनी काढले म्हणजे उद्धव ठाकरे यांना पण मान्य आहे कि हे राज्य हिटलरच्या मार्गाने जात आहे#आभार पण त्याच बरोबर हिटलरला साथ देण सोडा एवढीच विनंती.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 8, 2019
दरम्यान आरेमधील वृक्षतोडीविरोधात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. आरेमधील वृक्षतोडीविरोधात दाखल याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने आरेमधील वृक्षतोडीला तूर्तास स्थगिती दिली आहे. याप्रकरणी जोपर्यंत पर्यावरणविषयक खंडपीठाचा निर्णय येत नाही तोपर्यंत आरेमधील परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. आरेमधील झाडे तोडायला नको होती, असे सांगत सर्वोच्य न्यायाालयाने या प्रकरणी ज्यांना अटक करण्यात आली आहे, त्यांची तत्काळ सुटका करा, असे आदेश दिले.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1181522059257532416?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181521100359884801?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181520898798448643?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

