🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसची चिंता वाढली आहे. त्यामुळे शरद पवार यांना काहीतरी कमाल करावी लागणार आहे.
या पक्षांताराविषयी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाला लागलेल्या गळतीमुळे पक्षाध्यक्ष शरद पवार ‘जखमी’ झाले आहेत अस विधान केले आहे. तसेच मधुकर पिचड यांच्याकडून अपेक्षा नव्हती. पुरोगामी महाराष्ट्राची वाच्यता करणारे जातीयवाद्यांच्या कळपात जाऊन बसले आहेत. तसेच शिवेंद्रराजेंबद्दल आश्चर्य वाटतं. छत्रपतींचे वारसदार असूनही त्यांच्यामध्ये लढण्याची जिद्द नाही असही आव्हाड पुढे बोलताना म्हणाले.

तसेच पुढे बोलताना ‘राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाण्यामागे सत्तेची लाचारी हे कारण आहे. यांच्यामध्ये वैचारिक अधिष्ठान राहिलेलं नाही. मात्र वैचारिक संघर्षाची लढाई दोन-चार जण इथे तिथे गेले तर संपत नाही असंही जितेंद्र आव्हाड एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसला लागलेली गळती काही केल्या थांबायला तयार नाही. राष्ट्रवादीतून आतापर्यंत बऱ्याच नेत्यांनी पक्षांतर केले आहे. त्यात महिला नेत्या चित्रा वाघ, मुंबईचे नेते सचिन अहिर, आमदार वैभव पिचड,माजी मंत्री मधुकर पिचड यांचा समावेश आहे. तर इतरही अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याच बोललं जात आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
