Share

“केंद्राकडे ६२५ करोड रुपये पडून”, बिहारमधील NTPC परीक्षा घोटाळ्यावरून जितेंद्र आव्हाडांचा खुलासा

Published On: 

मुंबई: बिहारमध्ये रेल्वे भरती बोर्डाच्या एनटीपीसी परीक्षेत हेराफेरी झाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले (Uttar Pradesh student agitation)आहे. याअगोदर संतप्त विद्यार्थ्यांनी पाटणा, सीतामढी, मुझफ्फरपूर, आरा, बक्सर येथे रेल्वे मालमत्तेचे नुकसान केले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. दरम्यान याबाबतच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP leader Jitendra Awhad) यांनी मोठा खुलासा केला आहे.

“बिहारमध्ये सुरू असणाऱ्या रेल्वे बोर्ड-NTPC साठी बसलेल्या विद्यार्थ्यांच्या लढाईतील एक वास्तव सांगतो. जागा होत्या सगळ्या मिळून ३७ हजारांच्या आसपास. अर्ज आले जवळपास १,२५,००,००० (सव्वा करोड). आणि एका अर्जाची किंमत होती ५०० रुपये. एकूण झाले ६२५ करोड रुपये. एवढा पैसा, १ वर्ष झाले केंद्राकडे पडून आहे. त्यावरच वर्षभरातील गोळा झालेलं व्याज वेगळं.यावर एकतरी मीडिया हाऊस ने चर्चा घडवून आणली का..?”, असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

NTPC च्या परीक्षेसाठी एवढे अर्ज म्हणजे देशातील वास्तव आहे. हे भयाण वास्तव देशातील रोजगाराचे, बेरोजगारीचे आहे. हा स्फोट देशात अराजक माजवू शकतो.वेळीच सावध होऊन तरुणांच्या हातांना काम द्या. त्यांच्या स्वप्नांच्या सोबत खेळू नका. असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!