टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड हे महाराष्ट्रातले दिग्विजय सिंह आहेत असे विधान खुद्द दिग्विजय सिंग यांनी केलं आहे. भोपाळच्या प्रचारसभेत बोलत होते.
जितेंद्र आव्हाड हे दिग्विजय सिंग यांच्या प्रचारासाठी भोपाळमध्ये आहेत. ते वादग्रस्त विधान करणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या विरोधात दिग्विजय सिंग यांचा प्रचार करत आहेत. प्रचारसभेत दिग्विजय सिंग यांनी ‘जितेंद्र आव्हाड म्हणजे महाराष्ट्रातले दिग्विजय सिंह आणि भोपाळमधले दिग्विजय सिंह म्हणजे मध्य प्रदेशचे जितेंद्र आव्हाड’ असं विधान केलं आहे.
दरम्यान, दिग्विजय सिंग यांची प्रतिमा वादग्रस्त विधान करनारे नेते अशी आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हेही आपल्या रोखठोक भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

