🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारताच्या समृद्ध लोकशाहीचा कधीकाळी गळा घोटण्याचा प्रयत्न केला असल्याच खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी बीड येथे आयोजित ‘ संविधान सभेत ‘ केला. या वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापत असल्याचे लक्षात येताच आव्हाड यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
याबाबत बोलताना ते म्हणाले की, ‘ आपलं वक्तव्याचं विपर्यास केलं गेल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. “इंदिरा गांधी यांच्या असामान्य कर्तृत्वाबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. त्यांनी घेतलेले निर्णय हे क्रांतिकारी होते पण आणीबाणीबद्दल मतमतांतर असू शकतात, असे त्यांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिले.
इंदिरा गांधी ह्यांच्या असामान्य कर्तुत्वा बद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे.
त्यांनी घेतलेले निर्णय हे क्रांतिकारी होते पण आणिबाणी बद्दल मतमतांतर असू शकतात पण एक सत्य मात्र मी लपवू इच्छित नाही इंदीराजींची आणि मोदी शहांची तुलना होऊ शकत नाही ते जवळ. पास हि पोहचू शकत नाही pic.twitter.com/X97RZK9J9o— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 29, 2020
पुढे ट्विट मध्ये आव्हाड म्हणतात की, ‘तरीही एक सत्य मात्र मी लपवू इच्छित नाही इंदिराजींची आणि मोदी-शाहांची तुलना होऊ शकत नाही. ते इंदिरा गांधी यांच्या कर्तृत्वाच्या जवळपासही पोहचू शकत नाहीत, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करत असताना आणीबाणीचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी “देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीदेखील लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता”, असं वक्तव्य केलं होतं.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
