टीम महाराष्ट्र देशा :- गेल्या वर्षीपासून राफेल विमान हा विषय कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत राहिला आहे. मंगळवारी बहुप्रतीक्षीत आणि बहुचर्चित असे राफेल फ्रान्स सरकारने भारताला सुपुर्द केले. त्यानंतर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विजयादशमी निमित्त राफेलचे शस्त्रपूजन केले. मात्र, राफेलच्या या पूजनामुळे नेटीझन्सकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावरच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील राजनाथ सिंह यांच्यावर टीका केली आहे.
#PMCBank च्या ग्राहकांनी 2-2 लिंबू बँकेच्या प्रत्येक शाखेच्या मुख्य दरवाज्याला लावुन ठेवावा.. 2 लिंबू ठेवून राफेल सुरक्षित होऊ शकते तर तुमचे पैशे का नाही? ???????????? pic.twitter.com/x98Uc3iXRa
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 9, 2019
राफेल विमानाखाली जसे राजनाथ सिंह यांनी लिंबू ठेवले तसेच पीएमसी बँकेच्या ग्राहकांनी पीएमसी बँकेच्या प्रत्येक शाखेबाहेर लिंबू लावावा, अशी मिश्किल टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. दोन लिंबू ठेवून राफेल सुरक्षित होऊ शकतो, तर तुमचे पैसे का होणार नाहीत? असा मिश्किल सवाल त्यांनी ट्विटरवर उपस्थित केला.
दरम्यान, पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँके’च्या (पीएमसी) ४ हजार ३३५ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी चौघांना अटक करण्यात आलेली आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1181907315798073349?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1181908676203839491?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

