Aditya Thackeray । अकोला : शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवी दिली आहे. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर सत्तार यांना प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना सत्तार यांनी थेट सुप्रिया सुळेंना कॅमेरासमोरच शिवी दिली असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राजकारण चांगलच तापलं आहे. यावर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी संताप व्यक्त केलाय. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे अकोला दौऱ्यावर आहेत.
ते म्हणाले, “घटनाबाह्य कृषी मंत्री आहेत. काय नाव त्यांचं? काय नाव? अब्दुल गद्दार (पब्लिकमधून आवाज) होय… अब्दुल गद्दारच. त्या मंत्र्याने सुप्रिया सुळेंसाठी वापरलेला शब्द अत्यंत घाणेरडा असल्याचं आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणालेत.
“असे लोकं तुम्हाला तुमच्या पक्षात हवे आहेत का? अशी घाणेरडी लोकं जी महिलांना शिवीगाळ करतात, शेतकऱ्यांची खिल्ली उडवतात, तुम्ही दारू पिता का? असं जिल्हाधिकाऱ्यांना विचारतात ते मंत्री म्हणून चालणार आहे का?”, असा सवाल आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी भाजपला केला आहे.
दरम्यान, “अब्दुल सत्तार तुम्हाला शरम वाटते का?, कधी महाराष्ट्रातून तु निवडणून येऊन दाखव. आम्ही निवडणून येऊ देणार नाही. नुसते माफीने आता काम चालणार नाही. महिला नेत्यांना शिव्या देण्याचे काम जर अब्दुल सत्तार करत असतील तर या अब्दुल सत्तार महाराष्ट्रात पाय ठेऊ देणार नाही. यांनी ताबोडतोब राजीनामा दिला पाहीजे”, अशी मागणी विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Travel Guide | नोव्हेंबरमध्ये ‘या’ ठिकाणी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत फिरायला जाऊ शकता
- Atul Bhatkhalkar | “उद्धव ठाकरेंनी आधी कंगना, स्वप्ना पाटकर आणि नवनीत राणांची माफी मागावी”
- Abdul Sattar | सुप्रिया सुळेंवरील आक्षेपार्ह वक्तव्यानंतर अब्दुल सत्तारांचे स्पष्टीकरण; म्हणाले…
- Lunar Eclipse | अनेक वर्षानंतर यावर्षी आहे देव दिवाळी दिवशी चंद्रग्रहणाचा योग
- Amol Mitkari | “…नाहीतर महाराष्ट्रात फिरणे अवघड होईल” ; अमोल मिटकरींचा अब्दुल सत्तारांना इशारा


