Share

Health Care Tips | हाडांना मजबूत करायचे असेल तर आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: आपल्या शरीरातील हाडे (Bones) मजबूत असेल तर आरोग्य (Health) सुदृढ राहते. त्यामुळे आपण आपल्या शरीरातले हाडे नेहमी मजबूत (Strong) ठेवले पाहिजे. कारण हाडे कमकुवत असणे हा देखील एक आजारच आहे. त्याचबरोबर शरीरातील हाडे कमकुवत असली तर सांधेदुखीसह इतर आजारही निर्माण होऊ शकतात. शरीरामध्ये असलेल्या कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात. त्यामुळे कधी कधी हाडांची दुखापत होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियम युक्त पदार्थांची सेवन करणे अत्यंत गरजेचे असते. म्हणूनच आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हाडे मजबूत करण्यासाठी कोणत्या कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन करायला पाहिजे याबद्दल माहिती सांगणार आहोत.

पनीर

पनीर हा एक सर्वोत्तम कॅल्शियमचा स्त्रोत मानला जातो. कारण पनीर खायला जेवढे चविष्ट लागते तेवढेच त्यामध्ये कॅल्शियम उपलब्ध असते. त्याचबरोबर नियमित पनीरचे सेवन केल्याने आरोग्य ही सुदृढ राहते. पनीरमध्ये मुबलक प्रमाणामध्ये व्हिटॅमिन डी आढळून येते त्यामुळे मेंदू ही सक्रिय आणि निरोगी राहतो.

दुध

दुधामध्ये मुबलक प्रमाणामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी आढळते. त्याचबरोबर दुधाकडे संपूर्ण अन्न म्हणून देखील पाहिले जाते. त्यामुळे कधी कधी एकाच वेळी दूध पील्याने लवकर भूक लागत नाही. दुधाचे नियमित सेवन केल्याने आपल्या शरीराला व्यवस्थित प्रमाणात कॅल्शियम मिळून शरीरातील हाडे मजबूत राहतात.

पालक

कॅल्शियम आणि जीवनसत्वांचा पालक हा एक नैसर्गिक स्त्रोत आहे. त्याचबरोबर पालक मध्ये फायबरही मुबलक प्रमाणात आढळून येते. म्हणूनच आहारामध्ये पालकाचा समावेश केल्याने हाडे तर मजबूत राहतातच पण त्याचबरोबर आरोग्य ही निरोगी राहते. तर पालकमध्ये उपलब्ध असलेले फायबर अन्न पचवण्यास मदत करते. त्यामुळे शरीरातील पाचनक्रिया देखील सुरळीत होते.

केळी

केळीमध्ये मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. मॅग्नेशियमच्या मदतीने हाडांचा विकास जलद होतो. त्यामुळे नियमित केळीचे सेवन केल्याने हाडे मजबूत होऊन शरीर निरोगी राहते.

अंडी

अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, व्हिटॅमिन आणि कॅल्शियम उपलब्ध असतात. त्यामुळे दररोज एक ते दोन अंडी खाल्ल्याने आपल्या शरीरातील हाडे मजबूत होऊ शकतात. त्याचबरोबर अंड्याला इम्युनिटी बूस्टर देखील म्हणतात. त्यामुळे अंड्याचे नियमित सेवन केल्याने शरीरामध्ये एनर्जी राहते.

टीप : वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!