Share

धक्का मारत का होईना विकास होतो आहे हे ही नसे थोडके….

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून. सगळ्याच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तसतसं राजकीय पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप वाढू लागले आहेत. अशातच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते हरिभाऊ बागडे यांचा एक फोटो ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकांऊंटवरून हरिभाऊ बागडे यांच्या प्रचाराच्या रथाचा फोटो ट्विट केला आहे. यामध्ये काही लोक आणि शालेय विद्यार्थी त्या रथाला धक्का मारताना दाखवण्यात आले आहेत.

हा फोटो ट्विट करत त्यांनी त्यावर धक्का मारत का होईना विकास होतो आहे, हे ही नसे थोडके, असं कॅप्शन दिलं आहे. यामध्ये त्यांचा प्रचाराचा रथ चिखलात अडकल्याचं दिसत असून त्याला धक्का मारत असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, हरिभाऊ बागडे हे औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात रस्त्यांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेचं जितेंद्र आव्हाड यांनी बागडे यांच्यासह सरकारची खिल्ली उडवली आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182539868716421126?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1182538363959537664?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!