टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसच नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. महाभारतातील संजय आणि शिवसेनेतील संजय अनादी काळा पयेंत स्मृतीत राहतील. अस म्हणत आव्हाड यांनी संजय राऊतांचे गोडवे गायले आहेत.
सध्या संजय राऊत हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. दररोज संजय राऊत हे मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल हे ठासून सांगत आहेत. संजय राऊत यांच्याकडून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवरून सतत भाजपवर टीका करण्यात येत आहे. तसेच मुख्यमंत्रीपदावर सतत दावा करण्यात येत असल्याने अद्याप भाजप-शिवसेनेत चर्चा झालेली नाही.
महाभारतातील #संजय
आणि
शिवसेनेतील #संजय
अनादी काळा पयेंत स्मृतीत राहतील— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 5, 2019
दुसरीकडे शरद पवार यांच्याशी बोलण्यात गैर काय आहे. होय, मी त्यांच्या संपर्कात आहे. शरद पवार यांना राज्यात कशाला बोलविता. ते खूप मोठे नेते आहेत, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. आणि त्यांतर राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते जितेंद्र आव्हाड यांनी संजय राऊत यांची स्तुती केल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेना अस गणित महाराष्ट्रत पाहायला मिळू शकते.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1191584699904212992?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1191580298128965632?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1191576740956532736?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

