Jitendra Awhad । ठाणे : मुंबई, ठाणे आणि मराठी माणसाबद्दल आक्षेपार्ह विधान करणार्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या हजारो कार्यकर्त्यांनी राजभवनावर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना आनंद नगर येथेच अडवून ताब्यात घेतले. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी बसगाड्या सोडून रस्त्यावरुन चालत जाण्याचा प्रयत्न केल्याने हाय-वे वरील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती.
दरम्यान, कोश्यारींसारखे महाराष्ट्राचा इतिहास माहित नसलेले लोक येतात आणि महाराष्ट्राबद्दल वाटेेल ते बोलतात. मराठी माणसाचा अपमान आता मराठी माणूस सहन करणार नाही, असा इशारा डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबई, ठाणे आणि मराठी माणसाबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. गेल्या अनेक दिवसांपासून कोश्यारी हे आक्षेपार्ह विधाने करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबतही त्यांनी अत्यंत आक्षेपार्ह विधाने केली होती. याचा निषेध करण्यासाठी तसेच कोश्यारी यांना राज्यपाल पदावरुन हटविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
या मागणीसाठी जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राजभवनाच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न केला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी “ बहुत हुई हुशयारी, महाराष्ट्रसे भगाओ कोश्यारी; भाज्यपाल कोश्यारी यांचा निषेध आदी घोषणा दिल्या. सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास हजारो कार्यकर्त्यांनी विविध वाहनांसह मुंबईच्या दिशेने कूच केले. मात्र, आनंद नगर येथेच पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अडविले. त्यावेळी डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रस्त्यावर उतरुन चालत जाण्याचा पवित्रा घेतला. परिणामी, हायवेरील सबंध वाहतूक ठप्प झाली होती. अखेर कोपरी पोलिसांनी डॉ. आव्हाड, आनंद परांजपे, ॠताताई आव्हाड, नजीब मुल्ला यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
महत्वाच्या बातम्या :
- Chandrashekhar Bavankule । शिवसेना संपवण्याच्या नड्डा यांच्या वक्तव्याला चंद्रशेखर बावनकुळे यांचं समर्थन
- J P Nadda VS Udhav Thackeray : जेपी नड्डा यांच्या महाराष्ट्रात शिवसेना संपत असल्याच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचा पलटवार
- Ramdas Kadam : जेपी नड्डा यांच्या वक्तव्याशी सहमत नाही, रामदास कदमांचा भाजपवर पलटवार
- Ramdas Kadam : “तुम्ही राष्ट्रवादीचे गुलाम…”; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना सवाल
- Ramdas Kadam : उद्धव ठाकरे भाजपासोबत युती करण्यास तयार झाले होते; पण संजय राऊत…, रामदास कदमांचा गौप्यस्फोट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

