Chandrashekhar Bavankule । कोल्हापुर : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरील कारवाईमुळे शिवसेना चांगलीच अडचणीत आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मोठं वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रात शिवसेना संपत आहे. आता केवळ भाजप राहणार, असे वक्तव्य नड्डा यांनी पाटणा येथे केले आहे. भाजपशी लढण्याची क्षमता अन्य कोणत्याही पक्षात नाही भाजपसोडून सर्व राजकीय पक्ष संपतील, असे नड्डा म्हणाले. यानंतर शिवसेना नेते आक्रमक झाले आहेत.शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर थेट नड्डा यांना आव्हानच दिल आहे. तर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील मोठं वक्तव्य केलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले कि, यांनी जेपी नड्डा बोलले ते बरोबरच आहे. आम्ही येत्या लोकसभेत 400 जागा जिंकण्याचं टार्गेट ठेवलं आहे, असं सूचक विधान केलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्रातील 16 लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्र्यांचा लोकसभा प्रवास दौरा सुरू होणार आहे. कोल्हापूरला केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार, हातकणंगलेसाठी भुपेंद्र बघेल आणि बारामतीसाठी खास निर्मला सीतारामन यांना पाठवण्यात येणार आहे.महाराष्ट्रामधील हे 16 मतदारसंघ जिंकण्याचं ध्येय ठेवून हा कार्यक्रम हाती घेतलाय.
दरम्यान, दुसरीकडे भाजपशी युती केलेल्या शिंदे गटातील नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी भाजपवर पलटवार केलाय. रामदास कदम म्हणाले कि, जेपी नड्डा यांच्या वक्तव्याशी मी सहमत नसल्याचं रामदास कदम म्हणाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या नियंत्रणाखालील शिवसेना संपत चालली, असा खुलासा जेपी नड्डा यांनी केला असेल. त्याच्याशी मी सहमत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच काम सुरू आहे. त्यामुळं शिवसेना संपायचा प्रश्न येत नाही, असं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- J P Nadda VS Udhav Thackeray : जेपी नड्डा यांच्या महाराष्ट्रात शिवसेना संपत असल्याच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचा पलटवार
- Ramdas Kadam : जेपी नड्डा यांच्या वक्तव्याशी सहमत नाही, रामदास कदमांचा भाजपवर पलटवार
- Ramdas Kadam : “तुम्ही राष्ट्रवादीचे गुलाम…”; रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना सवाल
- Ramdas Kadam : उद्धव ठाकरे भाजपासोबत युती करण्यास तयार झाले होते; पण संजय राऊत…, रामदास कदमांचा गौप्यस्फोट
- NCP on Eknath Shinde | “मुख्यमंत्री जर ‘खऱ्या’ शिवसेनेचे असतील तर…” ; राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ शिंदेना आव्हान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

