🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : अभिनेता विवेक ओबेरॉयने आज आपल्या ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ऐश्वर्या राय, सलमान खान, विवेक ओबेरॉय आणि अभिषेक, आराध्यासोबतचे तीन फोटोज आहेत. सलमान, ऐश्वर्याच्या फोटोवर ‘ओपिनियन पोल’ लिहिले होते, ऐश्वर्या विवेकच्या फोटोवर ‘एग्झिट पोल’ लिहिले होते, तर नवरा अभिषेक आणि मुलगी आराध्यासोबतच्या फोटोवर ‘रिजल्ट्स’ असे लिहिले होते.
https://twitter.com/vivekoberoi/status/1130380916142907392
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही ट्वीट करत विवेक ओबेरॉयला लक्ष्य केले. यावेळी त्यांनी बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनाही टॅग केले. आव्हाड म्हणाले, “एखादा व्यक्ती किती खालच्या स्तरावर जाऊ शकतो? महिलेंबद्दलचा अनादर यातून पाहता येऊ शकतो. तू मर्यादा ओलांडली आहेस आणि महिलांचा अपमान केला आहे.” आव्हाड यांनी यावेळी सलमान खान नावाच्या एका अन्य ट्विटर हँडललाही टॅग केले.
How cheap a person can b … @vivekoberoi thinks after his film on #Modi he is reincarnation of #Modi
Look at the level of disrespect for women @SalmanKhanHolic don't u think he has crossed limits @SrBachchan it's disrespect to any women— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 20, 2019
मात्र विवेकचे हे ट्विट आल्यानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली आहे. विवेक ओबेरॉयने विवेकशून्य ट्विट करून आपली अक्कल ठीकाण्यावर आहे का असा सवाल विचारण्यास भाग पडल आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

