ठाणे – ठाणे शहरातील पदपथ आणि रस्ते अडविण्याऱ्या फेरीवाल्यांविरोधात महापालिका प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमे दरम्यान सोमवारी सायंकाळी कासारवडवली भागात माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांसह त्यांच्या अंगरक्षकावर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आयुक्तांच्या हाताची तीन बोटे तर अंगरक्षकाचे एक बोट कापले गेले. या घटनेनंतर कासारवडवली पोलिसांनी फेरीवाला अमरजीत यादव याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,पिंपळे या माजिवडा – मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत येत असलेल्या कासारवडवली नाक्यावर फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या. ठाणे महापालिकेच्या कारवाईच्या दरम्यान अमरजित यादव या फेरीवाल्याकडून पिंपळे यांच्यावर चाकूने अचानक हल्ला करण्यात आला. बचावासाठी त्यांनी हात वर केल्यावर त्यांची दोन बोटेच तुटून पडली. पिंगळे यांच्या बचावासाठी धावलेल्या अंगरक्षाचेही एक बोट तुटले आहे.
ठाणे महापालिकेतील अधिकारी कल्पिता पिंपळे ह्यांच्या वर झालेल्या हल्ल्याचा निषेध पण प्रश्न आहे कि अनधिकृत फेरीवाल्यां मध्ये इतका मास्तवालपणा इतकी मुजोरी येते कुठून protection money कोण घेतो तो कुणा पर्यंत जातो हे चक्र उध्वस्त केले पाहिजे नाहीतर उद्या हे मुजोर एखाद्याचा मुडदा पाडतील
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 30, 2021
या घटनेनंतर अवघ्या महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने या मुद्द्यावरून टीकेची झोड उठवली असताना दुसऱ्या बाजूला मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ठाणे महापालिकेतील अधिकारी कल्पिता पिंपळे ह्यांच्या वर झालेल्या हल्ल्याचा निषेध पण प्रश्न आहे कि अनधिकृत फेरीवाल्यांमध्ये इतका मास्तवालपणा इतकी मुजोरी येते कुठून protection money कोण घेतो तो कुणा पर्यंत जातो हे चक्र उध्वस्त केले पाहिजे नाहीतर उद्या हे मुजोर एखाद्याचा मुडदा पाडतील असं आव्हाड म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- सतर्क राहा : पुढचे ३-४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे; हवामान विभागाचा अंदाज
- संतापजनक : महिला अधिकाऱ्यावर फेरीवाल्याचा जीवघेणा हल्ला; दोन बोटं तुटली
- ‘बंद है मंदिर, बंद पाठशाला, खुली है लेकीन ‘मधुशाला’; भाजप महिला मोर्चाचा हल्लाबोल
- धार्मिक स्थळं बंद करण्यामागे सरकारचा हेतू काय?, राणाजगजितसिंह पाटील यांचा सवाल
- सरकारच्या नाकावर टिच्चून मनसेने मध्यरात्री दहीहंडी फोडली; पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतले


