Share

पुण्यातील जम्बो कोविड सेंटर अखेर सुरु!

Published On: 

🕒 1 min read

पुणे : गेले ५ महिने कोरोनाने संपूर्ण जगासह भारतात थैमान घातले आहे. राज्यात कोरोनाने शिरकाव केल्यापासून मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघायला मिळत आहे. गेल्या महिन्यात, आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीसह मुंबईमध्ये कोरोना आटोक्यात आल्याचा दावा मुंबई महानगरपालिका व राज्य शासनाने केला होता.

कोरोना रुग्णांबाबत सुरुवातीला मुंबईपाठोपाठ असलेल्या पुणे शहरात मात्र दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा हा वाढतच असून अनेक ठिकाणी रुग्णांना व्हेंटिलेटर्स तसेच बेड उपलब्ध होत नव्हते. त्यामुळेच, पुढील परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील पुण्याचा दौरा करून उपाययोजनांचा आढावा घेतला होता. यानंतर, पुणे महानगरपालिका व राज्य सरकारतर्फे पुण्यात जम्बो कोविड सेंटर्सच्या उभारणीला सुरुवात झाली होती.

‘शरद पवार साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण टिकवण्याबाबत शब्द द्यावा’

आता, COEP कॉलेज येथील हे सेंटर रुग्णांच्या प्रत्यक्ष उपचारांसाठी खुले करण्यात आल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटद्वारे सांगितले आहे. त्यामुळे रुग्णांना काहीसा दिलासा मिळाला असून या सेंटरची अद्ययावत उपलब्धतेची माहिती महानगरपालिकेच्या डॅशबोर्डवर देखील दर्शविण्यात येत आहे. एकूण ८०० बेडची व्यवस्था या सेंटर मध्ये करण्यात आली असून ६०० आयसोलेशन बेड्स ऑक्सिजन व्यवस्थेसह, १७० आयसीयू बेड्स विना व्हेंटिलेटर व ३० आयसीयू बेड्स व्हेंटिलेटर व्यवस्थेसह उपलब्ध करण्यात आले आहेत.

मराठा आरक्षण : आरक्षणाचा मुद्दा मोठ्या खंडपीठाकडे जाणार? सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी

दरम्यान, “पुणे शहरात काल नव्याने १,२०४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या ८५,७०० झाली आहे. तर १,१२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या १४,७२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील एकूण तपासणी आता ४,१४,२९४ झाली असून काल ६,३७० टेस्ट घेण्यात आल्या” असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

दिलासादायक: राज्यात कोरोनामुक्तांचा आकडा ५ लाखांपार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!