Share

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नवीन शैक्षणिक वर्ष सप्टेंबरपासून!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या २०२१-२२ शैक्षणिक वर्षाचे शैक्षणिक वेळापत्रक विद्या परिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. येत्या ३० ऑगस्ट पासून नवीन सत्र सुरू होणार असून १ ऑक्टोबरपासून तासिका सुरू करण्यास देखील मान्यता मिळाली आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेची बैठक मंगळवारी घेण्यात आली. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली नाट्यगृहात झालेल्या बैठकीला प्र-कुलगुरू डॉ. शिरसाठ कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्यासह ४५ सदस्य उपस्थित होते.

एकूण ३४ विषयांवर चर्चा होऊन या वेळी निर्णय घेण्यात आले. गेल्या दोन वर्षात विविध अधिकार मंडळाच्या सहकार्यातून महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मध्यंतरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक अडचणी आल्या. गेल्या सत्रातील परीक्षा यशस्वीपणे पार पडली. आगामी परीक्षादेखील ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. विद्यापीठातील सर्व पदव्युत्तर विभाग व संलग्न महाविद्यालये यांच्यात अभ्यासक्रम व परीक्षेत एकसारखेपणा आणण्यात येईल. असे कुलगुरूंनी सांगितले. या बैठकीत महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले.

एमएस्सी वनस्पतिशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रमांच्या सुधारित अभ्यासक्रमांना मंजुरी देण्यात आली आहे. परीक्षा व प्रात्यक्षिक नवीन मार्गदर्शक सूचना लागू करण्यास मान्यता मिळाली आहे. शारीरिक शिक्षण अभ्यासक्रमास मान्यता मिळाली आहे. एमफिल, पीएचडीसाठी सुधारित नियम लागू करण्यात आले आहेत. भारतीय संविधान हा विषय पदवी स्तरावर सुरू करण्यात येणार आहे. मिलेनियम कॉलेज येथील एमसीए, एमबीए अभ्यासक्रम रद्द करण्यात येणार आहेत. नवीन महाविद्यालय व विस्तारीकरणाअंतर्गत मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांना संलग्नीकरणासाठी शिफारशींना मान्यता मिळाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!