Share

‘गृहमंत्री अमित शहांनी तात्काळ राजीनामा द्यावा’ ; पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आसाम आणि मिझोराम यांच्यातील सीमावादाला सोमवारी हिंसाचाराचे गालबोट लागले. मिझोराममधील समाजकंटकांनी केलेल्या गोळीबारात आसामच्या सहा पोलिस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. या घटनेवरून आसामाचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी आणि मिझोरामचे मुख्यमंत्री झोरामथंगा यांच्यातही ट्विटरवरून शाब्दिक युद्ध रंगले. सीमाप्रश्‍नावरून दोन राज्यांतील हिंसाचार आणि दोन मुख्यमंत्र्यांचा वादानंतर संपूर्ण देशाचे लक्ष पूर्वेकडील या राज्यांकडे गेले. मात्र हा वाद नवा नसून १०० वर्षे जुना आहे. ब्रिटिश काळात मिझोरामला आसामचे लुशाई हिल्स नावाने ओळखले जात असे.

आसाम आणि मिझोरमच्या सीमावर्ती भागातील हिंसाचाराची जबाबदारी स्वीकारुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. त्यांनी ट्वीट करून हि ,अग्नी केली आहे. ते त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणाले कि. ‘आसाम-मिझोराम सीमेवर दोन्ही राज्यांच्या पोलीसांनी काल एकामेकांवर गोळीबार केला आणि ५ पोलीस शहीद झाले. या चकमकीत कच्छरचे पोलीस अधिक्षक वैभव निंबाळकर (मूळ पुण्याचे) हेदेखील गंभीर जखमी झाले आहेत.

आसाम-मिझोराम सीमेवरील या परिस्थितीला फक्त गृहमंत्री अमितशहा व आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा जबाबदार आहेत. प्रधानमंत्र्यांनी ताबडतोब इंटरस्टेट कॉन्सीलची बैठक बोलवली पाहीजे आणि ईशान्येकडील राज्यात शांतता प्रस्थापित केली पाहिजे.’ असे ट्वीट त्यांनी केले आहे.

तसेच यावेळी त्यांनी ट्विट करीत थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या घटनेची जबाबदारी स्विकारुन तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. आमदार चव्हाण यांनी आपल्या ट्विटमधून आसाम आणि मिझोरामच्या सीमावर्ती भागात होत असलेल्या संघर्षाबाबत माहिती दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!