🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आता सरकारी तपास यंत्रणा आपला तपास दिवसेंदिवस अधिकच घट्ट करत आहेत. सीबीआयकडून अनिल देशमुख यांच्याशी संबंधित असलेल्या १२ ठिकाणांवर छापेमारी केली गेली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, सांगली व अहमदनगर येथील ठिकाणांचा समावेश आहे. तर, अहमदनगर आणि मुंबईमध्ये डीसीपी राजू भुजबळ यांच्या घरी आणि पुणे, मुंबईत एसीपी संजय पाटील यांच्या निवासस्थानी छापेमारी करण्यात आली आहे.
अनिल देशमुखांवर आरोप असलेल्या 100 कोटी वसूली प्रकरणात सीबीआयने एकूण 12 ठिकाणी छापेमारी केली. पुणे येथील कोथरुडमध्ये एसीपी संजय पाटीलच्या घरी सीबीआयची रेड काल उशिरा पर्यंत चालली. एसीपी संजय पाटील मुंबई पोलीस सोशल सर्विसमध्ये असताना वाझे प्रकरण 100 कोटी वसूली केसमध्ये त्यांचे नाव समोर आलं होतं. एसीपी पाटील यांचं स्टेटमेंट पूर्वी सीबीआयने घेतला होतं. एसीपी संजय पाटील यांची ट्रांसफर LA विभागात करण्यात आला आहे.
मुंबई पोलीस दलातील उपायुक्त राजू भुजबळ यांचे नावही समोर आले होते. राजू भुजबळ हे मुळ संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा गावचे रहिवाशी आहेत. काल दुपारी सीबीआय पथकाने अचानक त्यांच्या घरी चौकशी केल्याची माहिती आहे. यांच्या व्यतिरिक्त काही मध्यस्थांच्या ठिकाणी छापेमारी केली आहे. ठाणे ,पुणे , आणि इतर। अनेक शहरात एकूण 12 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. छापेमारीची कारवाई संपली असून पुढील तपास सीबीआय करत आहे.
दरम्यान, सीबीआयने आपल्यावरील कारवाईसाठी राज्य सरकारची मंजुरी घेणे अनिवार्य होते, असा दावा देशमुख यांनी केला होता. पण या प्रकरणी न्यायालयानेच चौकशीचे आणि पुढील कार्यवाहीचे आदेश दिले होते. त्यामुळे सरकारच्या पूर्वपरवानगीची गरज नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘गृहमंत्री अमित शहांनी तात्काळ राजीनामा द्यावा’ ; पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी
- नियमित विद्यार्थ्यांसह शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी सरकारने उचलले ‘हे’ पाऊल
- भविष्यात कोरोना संसर्गापासून बचावासाठी काळजी घ्या, आमदार निलंगेकरांनी केले सांत्वन
- केंद्राकडून पूरग्रस्तांना ७०१ कोटींचा निधी, सदाभाऊ खोत यांनी मानले मोदींचे आभार
- नदीपात्रातील व ओढ्यावरील अवैध बांधकामांना कोणत्याही परिस्थितीत परवानगी देवू नका – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
