Share

प्रियदर्शिनी उद्यानात जेसीबीचा धक्का लागून वृक्षतोड, पर्यावरणप्रेमींची मनपा आयुक्तांकडे धाव!

Published On: 

औरंगाबाद : प्रियदर्शिनी उद्यानात स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृतीवनाचे काम सुरु आहे. पर्यावरणप्रेमींच्या सूचनेनुसार वृक्षतोड न करता काम केले जाईल असे आश्वासन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिले होते. मात्र सोमवारी (दि.२६) याठिकाणी काम करताना चिंचेच्या अतिशय जुन्या झाडाचा मुळापासून अर्धा भाग कापला गेला आहे. तसेच शौचालयाची जागा देखील बदलल्याने नवीन जागेवरील काटेरी, घाणेरी वनस्पती मुद्दामहून दाबल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी मनपा प्रशासनावर केला आहे.

सिडको भागातील एमजीएमच्या परिसरात असलेल्या प्रियदर्शिनी उद्यानातील १७ एकर जागेत शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक व उद्यान विकसित केले जात आहे. शिवसेनाप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जानेवारी महिन्यात प्रियदर्शिनी उद्यानातील शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारण्याच्या जागेची पाहणी केली होती. याठिकाणी घनदाट झाडी असल्यामुळे एकही झाड न तोडता स्मृतिवन व स्मारक उभारा असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले होते.

त्यानुसार मनपाच्या वतीने साडे दहा एकर मध्ये ४० प्लॉट करून त्यात ५८२८ विविध देशी व फळझाडांची लागवड करण्यात येणार आहे. मात्र सद्यस्थितीत वृक्षलागवड करण्याऐवजी मनपा आहे त्या झाडांचीच देखभाल करण्यास असमर्थ ठरत आहे. सध्या याठिकाणी काम सुरु असल्याने जेसीबी, पोकलेनचा वापर सुरु आहे. अतिशय पुरातन अशा चिंचेच्या झाडाचा काही भाग मुळापासून कापला गेल्याचे दररोज येणाऱ्या पर्यावरण प्रेमींच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी मनपा आयुक्तांना कळवले असता काम करतांना अशा गोष्टी ओघाने आल्याच, जेसीबीचा चूकून धक्का लागल्याने हि गोष्ट घडल्याची कबुली त्यांनी दिली.

मात्र एका झाडाला इजा होणे ही त्यांच्यासाठी सामान्यच गोष्ट आहे. जेसीबीचा चुकून धक्का लागल्याने या वृक्षाचा काही भाग तुटला आहे. मात्र हेतूपुरस्सर किंवा मुद्दामहून हा प्रकार झालेला नाही. चूकून तुटलेले झाड आणि मुद्दामहून तोडलेल्या झाडातील फरक लगेच लक्षात येअशी प्रतिक्रिया उद्यान निरिक्षक विजय पाटील यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!