Share

‘आता आपल्याकडे मौनेंद्र मोदी आहेत’, पंतप्रधान मोदींवर जोरदार घणाघात

Published On: 

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून लडाखमध्येभारत आणि चीनचे सैन्य आमनेसामने येत आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर काही दिवसांपासून तणाव निर्माण झाला. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेसने जोरदार हल्लाबोल केला आहे. नरेंद्र मोदी हे सीमा वादावर राजकीय पक्षांना आणि माजी पंतप्रधानांना माहिती देत नसल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी ट्विटवरून मोदींवर निशाणा साधला आहे.

चीनने 1962 मध्ये भारतावर हल्ला केला. अटल बिहारी वाजपेयी आणि अन्य नेत्यांनी त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना पत्र लिहून संसदेचं अधिवेशन बोलावण्याची मागणी केली. नेहरूंनी देखील त्यांच्या मागणीचा स्वीकार केला आणि त्यांच्यावर केलेल्या टीकाही त्यांनी ऐकल्या… आता आपल्याकडे ‘मौनेंद्र मोदी’ आहेत. ते माजी पंतप्रधान किंवा राजकीय पक्षांच्या नेत्यांना कोणतीही माहिती देत नाहीत. असं ट्वीट जयराम रमेश यांनी केलं आहे.

दरम्यान, चीनने सीमेवर घुसखोरी करून भारताचा भूभाग बळकावला असल्याच्या बातम्या मागील काही दिवसांपासून प्रसारमाध्यमातून येत असून सत्य परिस्थिती काय आहे हे मोदी सरकारने जनतेला सांगण्याची आवश्यकता आहे. चीनने खरेच सीमेवर आगळीक केली असेल तर मोदींनी यापूर्वी म्हटल्याप्रमाणे चीनला लाल डोळे वटारून दाखवण्याची हीच योग्य वेळ असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे..

तुमच्या जिवापेक्षा मला अधिक मोलाच काहीच नाही, राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना पत्र

यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, चीनने लडाखच्या भागात तीन ठिकाणी अतिक्रमण केल्याच्या बातम्या येत असून ही चिंतेची बाब आहे परंतु सरकारने अद्याप यावर स्पष्टीकरण दिलेले नाही. चीनने सीमेवर आगळीक केली आहे की नाही याची माहिती मोदी सरकारने जनतेला द्यावी ही काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची मागणी योग्यच असून सरकारने वस्तुस्थिती सांगावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या विषयावर जाहीर वक्तव्य करतात पण आता अचानक शांत का आहेत? ही शांतता कानठळ्या बसवणारी आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शेरोशायरी केली पण राहुल गांधी यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळले.

मुख्यमंत्री कलाकार आहेत पण मला ते त्यांची कला शिकवत नाहीत – राज्यपाल

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!