Share

मुख्यमंत्री कलाकार आहेत पण मला ते त्यांची कला शिकवत नाहीत – राज्यपाल

Published On: 

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री कलाकार आहेत. मला तर ते त्यांची कला शिकवत नाहीत. पण, कदाचित समूह विद्यापीठात येऊन तुम्हाला ते आपली कला शिकवतील असा टोला राज्यपाल भगतसिंग कोश्यारील यांनी राच्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

मुंबईतील के. सी. महाविद्यालय, एच. आर. वाणिज्य महाविद्यालय व बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज यांचा समावेश असलेल्या हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट (एचएसएनसी) समूह विद्यापीठाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून करण्यात आले.यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री ठाकरेही उपस्थित होते.

कलाकार असल्यामुळेच मुख्यमंत्री झालो, राज्यपालांसमोरच उद्धव ठाकरेंची तुफान फटकेबाजी

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी देखील राज्यपालांसमोर तुफान फटकेबाजी केली. ‘आपण मुख्यमंत्री झालो नसतो, तर नक्कीच एक कलाकार झालो असतो, किंबहुना आपण कलाकार असल्यामुळेच मुख्यमंत्री आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या समोरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपत्कालीन स्थितीत परीक्षा नव्हे तर शिक्षण सुरू राहणे महत्त्वाचे आहे, असे विधान करत राज्यपालांवरच निशाणा साधला.

तर राज्यसरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील संघर्ष आता राज्याला नवा नाही. या संघर्षाचा पुढचा अंक राज्याला राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या निवडीवेळी पाहायला मिळू शकतो. तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची जोरदार जुगलबंदी पाहायला मिळाली आहे.

मुंबई पोलीस होणार आता अधिक गतिमान…

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!