मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्राद्वारे आपल्या मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. जोपर्यंत कोरोनावर योग्य औषध सापडत नाही तोपर्यंत आपल्याला कोरोनासोबत जगण्याची तयारी मनाने करायला हवी. सध्या एकूणच महाराष्ट्राने तशी तयारी केलेली दिसत असल्याचं देखील त्यांनी यावेळी पत्रात म्हटलं आहे.
राज ठाकरे यांनी या पत्रात मनसे कार्यकर्त्यांच कौतुक केलं आहे. मनसे कार्यकर्ते लोकांच्या मदतीला धावून जात असल्याचा आनंद आणि अभिमान वाटत असल्याचं या पत्रात म्हटलं आहे. तसेच आपल्यासारखे सैनिक आपल्याला लाभले म्हणून आपण भाग्यवान असल्याचं देखील म्हटलं आहे.

मुख्यमंत्री कलाकार आहेत पण मला ते त्यांची कला शिकवत नाहीत – राज्यपाल
१४ जून रोजी राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. यावेळी परिस्थिती वेगळी आहे. कोरोनामुळे सगळीकडे चिंतेचं वातावरण आहे. आणि अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणं अजिबात उचित नाही. म्हणून कुणीही शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात तिथे जनतेला मदत करा, दिलासा द्या… ह्याच माझ्यासाठी शुभेच्छा असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, हे करताना तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. तुमच्या जिवापेक्षा मला अधिक मोलाच काहीच नाही. सगळ सुरळीत झाल्यावर मी तुम्हाला भेटायला येणारच आहे. तेव्हा तुमच्याशी भेट होईलच. अस देखील राज ठाकरे यांनी पत्रात म्हंटल आहे.
कलाकार असल्यामुळेच मुख्यमंत्री झालो, राज्यपालांसमोरच उद्धव ठाकरेंची तुफान फटकेबाजी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

