मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामतीतूनच विसर्जन केले, तर राज्यातून या पक्षाचे विसर्जन झाल्याशिवाय राहणार नाही, त्यामुळे या निवडणुका जिंकण्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे .यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टोला लगावला होता. यानंतर यावर आता राष्ट्रवादीतून प्रतिक्रिया समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले जयंत पाटील –
बारामतीमधील जनता कशी आहे याची माहिती त्यांना नाही. त्यामुळे कुणीही बारामतीत आले तरी एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य सुप्रियाताई सुळे आणि अजित पवार यांना मिळतेच. बारामतीत सूर्य एखाद्यावेळी पश्चिमेकडे उगवेल. परंतु बारामती पवारसाहेबांना सोडणार नाही. एवढं ते घट्ट नातं बारामतीकर आणि पवार कुटुंबीयांचं आहे, असं पाटील यांनी सांगितलं. एखाद्याचा अश्वमेध रोखल्यावर जो त्रास होतो, तो त्रास शरद पवार साहेबांच्या बारामतीत भाजपला होतोय, असा टोलाही त्यांनी लगावला.
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले –
माळेगाव नगरपंचायत भाजपच्या झेंड्याखाली आणायची आहे. त्यादृष्टीने येथील नेतेमंडळींसह कार्यकर्त्यांनी आतापासून कामाला लागले पाहिजे, असं बावनकुळे म्हणाले. ज्या दिवशी ही नगरपंचायत भाजपच्या ताब्यात येईल, त्याच दिवशी राज्याच्या तिजोरीतून पाच कोटींचा विकास निधी माळेगावला दिला जाईल, असं आश्वासन देखील बावनकुळे यांनी यावेळी दिलं.
नगरपंचायतीचा पंचवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम येत्या काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या घोषणेची सर्वजण प्रतिक्षा करत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बावनकुळेंनी माळेगावात बुथ कमिटीतील कार्यकर्त्यांची विशेष बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी ही ऑफर दिली.
देशात पंतप्रधान मोदीसाहेबांचे नेतृत्व सर्वमान्य झाले आहे. त्यात आता महराष्ट्रात देखील भाजपचं सरकार आलं आहे. यापुढील काळातील लोकसभा निवडणूक असो किंवा माळेगावसारख्या नगरपंचायती, महानगरपालिकांच्या निवडणूका आपल्याला जिंकायच्या आहेत, असं म्हणत कार्यकर्त्यांच्यात स्पुर्ती जागवण्याचा प्रयत्न बावनकुळे यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Election Commission | आत्ताची मोठी बातमी! 18 जिल्हे, 1166 ग्रामपंचायत अन् निवडणुकीचा धुरळा उडाला…
- Navneet Rana | नवनीत राणा यांची पोलिसांसोबत हुज्जत
- BJP | पेंग्विनसेना मेळाव्याला परवानगी दिली पाहिजे, महाराष्ट्र हास्यजत्रेची वाट पाहतोय; भाजपचा सेनेला टोला
- Navneet Rana | पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी माझा कॉल रेकॉर्ड केला – नवनीत राणा
- Chandrasekhar Bawankule | “…अन् 5 कोटी मिळवा”; चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट ऑफरच दिली


