🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा आज वाढदिवस. वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राजकीय नेते मंडळींनी देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ आणि प्रमुख नेते आहेत. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1947 रोजी नाशिक येथे झाला. त्यांनी मुंबईतील व्हिक्टोरिया ज्य़ुबिली टेक्निकल इन्स्टिट्यूटमधून मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदविका प्राप्त केली आहे.
छगन भुजबळ यांना वढदिवसाच्या शुभेच्छा देताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटिल यांनी त्याच्या एका खास आठवणीला उजाळा दिला आहे. ‘संघर्ष हा कुणालाच चुकला नाही. भुजबळ साहेबही त्यापैकी एक. महाराष्ट्रात फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार जनमनात रुजवताना भुजबळ साहेबांना मोठ्या संघर्षातून जावे लागले. भुजबळ साहेबांना महाराष्ट्राच्या राजकारणातील एक संघर्षयात्री म्हटले तर वावगं ठरणार नाही’. अस जयंत पाटील म्हणाले आहेत.
तर, माझ्या अपघाताचा प्रसंग आठवतोय. दोन्ही पाय फ्रॅक्चर असताना भुजबळ साहेब भेटायला आले. ‘जयंत, अर्थसंकल्प तुम्हालाच मांडायचा आहे’ त्यांचे हे शब्द मला ऊर्जा देऊन गेले. त्यांच्या धीराने मला झालेला अपघात किरकोळ वाटू लागला. मी अर्थसंकल्प तयार केला, व्हीलचेअरवर बसून सभागृहात मांडलाही. माणसाने संघर्षाला सामोरे कसं जावे हे शिकविणाऱ्या भुजबळ साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! अशा भावना जयंत पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.
https://twitter.com/Jayant_R_Patil/status/1316605820801490946?s=20
माझ्या अपघाताचा प्रसंग आठवतोय. दोन्ही पाय फ्रॅक्चर असताना भुजबळ साहेब भेटायला आले. 'जयंत, अर्थसंकल्प तुम्हालाच मांडायचा आहे' त्यांचे हे शब्द मला ऊर्जा देऊन गेले. त्यांच्या धीराने मला झालेला अपघात किरकोळ वाटू लागला. मी अर्थसंकल्प तयार केला, व्हीलचेअरवर बसून सभागृहात मांडलाही.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) October 15, 2020
माणसाने संघर्षाला सामोरे कसं जावे हे शिकविणाऱ्या भुजबळ साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!@ChhaganCBhujbal
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) October 15, 2020
महत्वाच्या बातम्या
- टीआरपी घोटाळा प्रकरणात रिपब्लिक टीव्हीला सुप्रीम कोर्टाने दिला जोरदार झटका…
- निर्यातबंदी कायमस्वरूपी न उठविल्यास, कांदा सीमापार आंदोलन करू- अनिल घनवट
- राज ठाकरेंना भेटताच ग्रंथालये झाली सुरु,अवघ्या 7 दिवसात राज्य सरकारला घ्यावा लागला निर्णय
- सुशांतचा ‘केदारनाथ’ पुनर्प्रदर्शनावर चाहत्यांचा विरोध
- मेरे पास ना घर ना द्वार, फिर क्या उखाडेगी बुल्डोजर सरकार – अमृता फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
