Share

जयंत पाटील पोहोचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर;अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची केली पाहणी

Published On: 

सांगली- परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमशान घातले आहे. पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. खर तर मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून लोकांना धीर देणे अपेक्षित होते मात्र घरात बसून मुख्यमंत्री कारभार हाकत असल्याने जनतेमध्ये नाराजी वाढू लागली आहे.

राज्यात परतीचा पाऊस, वादळीवारे आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. पिकांची आणि मालमत्ता नुकसानीबाबत माहिती घेतानाच त्यांनी सर्व यंत्रणांना मनुष्यहानी होऊ नये यासाठी सतर्क राहण्याचे निर्देशही दिले आहेत मात्र तरीही लोकांमध्ये नाराजी वाढतच आहे.

दरम्याण, सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी आणि दिलासा देण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांची थेट बांधावर जाऊन भेट घेतली.यावेळी आमदार अनिल बाबर, माजी आमदार सदाशिव पाटील, जिल्हाअध्यक्ष अविनाश पाटील, बाबासो मुळीक, बाळासाहेब पाटील, किसन जानकर, प्रांताधिकारी, तहसीलदार व अधिकारी उपस्थित होते.

मागील ४८ तासांपासून सांगली जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. झालेल्या या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान झाले. संकटात सापडलेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रशासनाला सोबत घेऊन आज खानापूर, आटपाडी तालुक्यातील गावांना भेटी देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!